शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात पवारांनी मध्यस्थी करावी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 01:39 IST

केंद्र सरकार कृषिविषयक कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करायला तयार आहे. परंतु दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता राजकीय झाल्याची  टीका करतानाच माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याचा अभ्यास करावा, त्यांचा कृषिक्षेत्रातील अभ्यास मोठा असून, त्यांनी विरोध करण्याऐवजी आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये मध्यस्थी करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचे राजकारण होत असल्याची टीका

नाशिक : केंद्र सरकार कृषिविषयक कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करायला तयार आहे. परंतु दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता राजकीय झाल्याची  टीका करतानाच माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आंदोलनाला पाठिंबा देण्याऐवजी कायद्याचा अभ्यास करावा, त्यांचा कृषिक्षेत्रातील अभ्यास मोठा असून, त्यांनी विरोध करण्याऐवजी आंदोलक आणि केंद्र सरकारमध्ये मध्यस्थी करावी, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  दिल्लीतील शेतकरी सरकारची भूमिका ऐकायला तयार असले तरी त्यांचे नेते तयार नसल्याने यावरून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे राजकारण केले जात असल्याची टीका करतानाच शेतकरी आंदोलनाचे राजकीय टुरिझम झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्याचप्रमाणे अण्णा हजारे यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर  सरकारच्या भूमिकेवर अण्णा हजारे यांनी विचार करणे आवश्यक असून, आपण याविषयावर अण्णांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संभाजीनगर नामकरणाला विरोध नसल्याचा पुनरुच्चार करतानाच विमानतळाला वेरूळ अजिंठा नाव देण्याची मागणीही त्यांनी केली. मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे,  चैत्यभूमी परिसराचा जीर्णोद्धार करावा आणि इंदू मिलचे काम पूर्ण करावे, अशा मागण्याही मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या खासदारांच्या चर्चेत केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नाशिकमध्ये झालेल्या जातपडताळणी आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगतानाच  अर्णव गोस्वामी प्रकरणी दोषींवर कारावाई  व्हायला हवी,  असेही ते म्हणाले. दरम्यान, कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सुशीलकुमार यांची निवड झाली तर  आनंदच आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :NashikनाशिकSharad Pawarशरद पवारRamdas Athawaleरामदास आठवले