नाशिक : उसनवार दिलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून तिघा संशयितांनी एकावर वस्तऱ्याने वार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी बोधलेनगर परिसरात घडली़ बोधलेनगरमधील स्प्रिंग व्हॅलीतील रहिवासी लक्ष्मण गरफाळ (२२) यांनी संशयित शफिक पिंजारी यांच्याकडून एक हजार रुपये उसनवार घेतले होते़ हे पैसे परत न केल्यामुळे संशयित शफिक पिंजारी, पिंजारीचे दाजी व एक साथिदार अशा तिघांनी गरफाळ यांना फोन करून घराच्या पाठीमागे बोलावून घेतले़ यातील दोघांनी गरफाळ यांना पकडून ठेवले, तर पिंजारीने वस्तऱ्याने छातीवर व डाव्या हातावर वार केले़
पैशातून बोधलेनगरमधील एकावर वार
By admin | Updated: March 20, 2016 23:56 IST