शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हातपंप जर्जर, यंत्रणांना फुटेना पाझर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 16:53 IST

कळवण तालुका : अनेक हातपंप नादुरुस्त, यंत्रणेचे दुर्लक्ष

ठळक मुद्देकळवण तालुक्यात ५५० हातपंप व १३८ जलपऱ्या आहेत.ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेत ४१० हातपंपांचा करार झालेला आहे

मनोज देवरेकळवण : तालुक्याच्या आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी, यासाठी तालुक्यातील ठिकठिकाणी हातपंप बसविण्यात आले आहे. हातपंप कोणत्या भागात लावायचा? त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात भूगर्भात पाण्याची सुविधा आहे का याची चाचपणी करु नच हातपंप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु पाणी पातळी खालावल्याने या हातपंपाकडे यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरावस्था झाली आहे. हातपंप जर्जर झाले असताना संबंधित यंत्रणांना पाझर फुटत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.कळवण तालुक्यात ५५० हातपंप व १३८ जलपऱ्या आहेत.ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेत ४१० हातपंपांचा करार झालेला आहे.त्यातील ३९८ पंप चालु असून २० हातपंप पाणीपातळी खालावल्याने बंद असल्याची माहिती समोर आली आहे. तर ग्रामपंचायती देखभाल दुरु स्ती करत नसल्याने अनेक हातपंप बंद पडले असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या यंत्रणेने सांगितले. उन्हाळ्यात ग्रामीण व आदिवासी भागातील, खेड्यापाड्यातील, वाडयावस्तीवरील सर्वसामान्य नागरीकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महिलांना तर हंडाभर पाण्यासाठी पायपीटही करावी लागते.ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या बहुतांश हातपंपांचीही दुरवस्था झाल्याने तर कुठे पाणी पातळी खालावल्याने २० हातपंप बंद पडले आहेत.मे महिना सुरु झाला असून दिवसेंदिवस दाहकता वाढत आहे.अनेक गावातील पाणीपातळी खालावल्याने पाणीटंचाई जाणवत आहे.कळवण तालुक्यातील काही गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.पाणीटंचाई दुर करण्यासाठी गेल्या काही वर्षात शासनाने टप्प्याटप्प्यात गाव,वाड्या,वस्त्यांवर विंधनविहिरी खोदुन त्यावर हातपंप बसवले आहेत.हे हातपंप सुरवातीच्या काळात योग्य पद्धतीने चालले.मात्र देखभाल दुरु स्तीअभावी अनेक पंप बंद पडले असुन त्यांचा वापर थांबल्याने पंप गंजले,तुटले आहेत

टॅग्स :Nashikनाशिक