शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

इतिवृत्ताला मंजुरी देऊन पूर्व प्रभाग सभेला विराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:20 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या ‘कामाची आवश्यकता’, ‘तांत्रिक योग्यता’, आणि ‘व्यवहार्यता’ या त्रिसूत्रीचा फटका पूर्व प्रभाग समितीच्या सलग दुसऱ्या सभेलाही बसला. सभेत एकही विषय न आल्याने मागील इतिवृत्ताला मंजुरी दिल्यानंतर केवळ चर्चा करून सभेला पूर्णविराम देण्यात आला.

इंदिरानगर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या ‘कामाची आवश्यकता’, ‘तांत्रिक योग्यता’, आणि ‘व्यवहार्यता’ या त्रिसूत्रीचा फटका पूर्व प्रभाग समितीच्या सलग दुसऱ्या सभेलाही बसला. सभेत एकही विषय न आल्याने मागील इतिवृत्ताला मंजुरी दिल्यानंतर केवळ चर्चा करून सभेला पूर्णविराम देण्यात आला. पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. प्रभाग ३० मधील पांडवनगरी, कलानगर व राजीवनगरसह परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्र ार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी  केली. गेल्या पंचवार्षिक मध्येही पाणीप्रश्नाची समस्या होती. प्रत्येक सभेत पोटतिडकीने पाणीप्रश्न मांडूनही प्रश्न सुटत नाही, अशी तक्र ार सतीश सोनवणे यांना केली. मनपाची तक्र ार करण्यासाठी असलेल्या अ‍ॅपमध्ये श्रद्धा रो-हाउस कॉर्नरला असलेली जुनी व पडिक विहिरीची तक्र ार केली असता काही दिवसांतच संबंधित विहीर बुजवण्यात आल्याची खोटी माहिती दिल्याची तक्र ार अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी केली. अ‍ॅपवरच नगरसेवकांनाच खोटी माहिती दिली जात असेल तर इतर नागरिकांचे काय, असा सवालही त्यांनी केला. परिसरातील खड्डे बुजविण्यासाठी संबंधित ठेकेदाराला संपर्क केला असता त्याने उडवा उडवीचे उत्तर दिल्याची तक्र ारही बडोदे यांनी केली. सह्याद्री हॉस्पिटल ते काठेगल्ली सिग्नल या रस्त्यावर हातगाड्यांचे अतिक्र मण वाढत असल्याची तक्र ार अर्चना थोरात यांनी केली. प्रभाग २३ मधील सावरकर उद्यानांमधील खेळणी तुटलेल्या असून, लहान मुले खेळत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्या तातडीने काढून घ्यावी, अशी मागणी अजिंक्य साने यांनी केली. टाकळी येथील शौचालयाचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याची तक्र ार सुषमा पगारे यांनी केली. या चर्चेनंतर सभा आटोपती घेण्यात आली.मुकणेसंबंधी विधानाचे पडसादमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर केल्यानंतर मुकणे धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरजच नव्हती, असे विधान केले होते. त्याचे पडसाद प्रभाग सभेत उमटले. यावेळी सत्ताधारी भाजपाचे सतीश सोनवणे यांनी सांगितले, मुकणे धरणातून पाणीयोजनेची गरज नसल्याचे सांगणाºया आयुक्तांनी प्रभाग ३० मधील पाणीप्रश्न किती गंभीर आहे हे बघावे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून मुकणे धरणाची निर्मिती करण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका