शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’सदृश रुग्ण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 22:29 IST

नाशिक : शिक्षणासाठी इटलीला गेलेला मूळ चंद्रपूरचा रहिवासी विद्यार्थी शहरात बहिणीला भेटण्यासाठी आला असता त्यास सर्दी व थकवा जाणवू लागल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्यास अ‍ॅलर्जिक सर्दी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शल्य चिकित्सकांच्या आदेशान्वये विशेष विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्दी अन् थकव्याचा त्रास : इटलीवरून आल्याने घेतली विशेष खबरदारी

नाशिक : शिक्षणासाठी इटलीला गेलेला मूळ चंद्रपूरचा रहिवासी विद्यार्थी शहरात बहिणीला भेटण्यासाठी आला असता त्यास सर्दी व थकवा जाणवू लागल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्यास अ‍ॅलर्जिक सर्दी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शल्य चिकित्सकांच्या आदेशान्वये विशेष विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.चीनमधून फैलावलेल्या ‘कोरोना’ या जीवघेण्या आजाराने विविध देशांमध्ये विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर भारतात सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे. इटलीत वास्तव्य करणारा विद्यार्थी इटलीवरून थेट नाशिक शहरात बहिणीक डे आला असता त्यास सर्दी, थकवा जाणवू लागला. मनपाच्या आरोग्य विभागाने त्याची तपासणी करून त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी त्यास संशयित रुग्ण म्हणून दाखल केले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्दीसोबत ताप, खोकला, कफ, श्वासोच्छवास घेण्यास अडथळा जाणवणे, आदी लक्षणे आढळून येतात. सध्या परदेशांमधून भारतात परतणाऱ्या रुग्णांना त्रास जाणवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्या रुग्णाची वैद्यकीय सूत्रांकडून तत्काळ उपचार व उपाययोजना क रण्याचे आदेश सरकारी यंत्रणांना देण्यात आले आहे.दाखल रुग्ण हा कोरोनासदृश संशयित आहे. विषाणूची लागण झाल्याचे अद्याप स्पष्ट नाही; त्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. तो इटलीत वास्तव्यास असल्यामुळे खबरदारी म्हणून विशेष कक्षात ठेवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल