शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाथर्डीकरांना दृष्टीस पडला चक्क रानगवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:15 IST

अजस्त्र असा शाकाहारी वन्यप्राणी रानगवा भारतात आढळतो. नाशिक शहराजवळच्या पाथर्डी गावाच्या शिवारात चक्क रानगव्याने ग्रामस्थांना दर्शन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाथर्डी गावाच्या परिसरातून नागरीवस्तीकडे गवा येत असल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहिती मिळाल्याने वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन सैन्यदलाच्या जंगलाच्या दिशेने गव्याला पिटाळले.

इंदिरानगर : अजस्त्र असा शाकाहारी वन्यप्राणी रानगवा भारतात आढळतो. नाशिक शहराजवळच्या पाथर्डी गावाच्या शिवारात चक्क रानगव्याने ग्रामस्थांना दर्शन दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाथर्डी गावाच्या परिसरातून नागरीवस्तीकडे गवा येत असल्याचे लक्षात येताच वनविभागाला माहिती मिळाल्याने वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन सैन्यदलाच्या जंगलाच्या दिशेने गव्याला पिटाळले. याबाबत वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी (दि.२८) दुपारी बारा वाजेच्या सुमारास रानगवा आढळून आल्याने प्रथमदर्शनी नागरिकांमध्ये घबराट पसरली. रेड्यासमान अजस्त्र भारदार शरीराचा प्राणी भटकत असल्याचे काही गावकºयांना दिसले. त्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचाºयांनी सुरक्षितरीत्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी शिवारात आल्याचे वन अधिकाºयांनी सांगितले.  जाचक मळा येथील श्यामदर्शन व शिवपॅलेस या परिसरात रानगवा फेरफटका मारताना आढळून आला. सर्वप्रथम नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले; मात्र काही नागरिकांना त्या वन्यप्राण्याचे अजस्त्र रूप पाहून धक्का बसला. एवढा मोठा प्राणी अचानकपणे परिसरात अवतरल्याने नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली.रानगवा हा स्वभावाने शांत वन्यप्राणी असल्यामुळे नागरिकांनी हेतूपुरस्सर त्याला त्रास देण्याचाप्रयत्न करू नये, त्या प्राण्यापासून नागरिकांना तसा कुठलाही धोका नसल्याचे पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक टी.ब्युला एलिल मती यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल