शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रियकराला अखेर अटक; नातीनंतर आजीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 20:18 IST

मंगळवारी (दि.७) उपचारादरम्यान तीची आजी पिडीता संगीता देवरे यांनाही वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले. या दुर्दैवी घटने आजी-नाती चा मृत्यू झाला असून पिडित महिलेची मुलगी प्रितीदेखील गंभीर आहे.

ठळक मुद्दे प्रेयसीसह तिची मुलगी व ९ महिन्यांच्या नातीला जिवंत पेटवून देत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला पिडीता संगीता देवरे यांनाही वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले

नाशिक : अनैतिक संबंधाच्या वादातून परप्रांतीय प्रियकराने प्रेयसीच्या घरी अर्थात माहेरी आलेल्या विवाहिता प्रीती शेंडगे (रा.कोणार्कनगर) व त्यांची कन्या अर्थात प्रेसयसीची नात सिध्दी रामेश्वर शेंडगे (वय,९) यांच्यासह ४०वर्षीय प्रेयसीवर रॉकेल ओतून जीवंत जाळण्याचा प्रयत्न नाशिकमधील पंचवटी परिसरातील फुलेनगर परिसरात झाल्याचे उघडकीस सोमवारी (दि.६) आले. या घटनेत मंगळवारी बालिका सिध्दीचा मृत्यू झाला तर मंगळवारी (दि.७) उपचारादरम्यान तीची आजी पिडीता संगीता देवरे यांनाही वैद्यकिय अधिका-यांनी मयत घोषित केले. या दुर्दैवी घटने आजी-नाती चा मृत्यू झाला असून पिडित महिलेची मुलगी प्रितीदेखील गंभीर आहे. संशयित परप्रांतीय आरोपी जलालुद्दीन खान (रा. उत्तरप्रदेश, अलीगढ) याच्या शोधात पथक रवाना झाले होते. संध्याकाळी अलीगढमध्ये त्याच्या मुसक्या आवळण्यात पंचवटी पोलिसांना यश आले.काल सोमवारी (दि.६) दिंडोरीरोडवरील मायको दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या कालिकानगरला खान याने ४० वर्षीय प्रेयसी तिची २० वर्षीय मुलगी व एक ९ महिन्यांची बालिका अशा तिघींनाही भरझोपेत असतांना त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेत सिद्धी रामेश्वर शेंडगे (९ महिने) हिचा होरपळून मृत्यू झाला होता. फुलेनगर परिसरात राहणा-या प्रेयसीने काही दिवसांपुर्वीच कालिकानगरला खोली घेतली होती तर तिचा प्रियकर खान हादेखील बरोबर राहत होता. तीन ते चार दिवसांपुर्वीच त्या महिलेची कोणार्कनगर परिसरात राहणारी २० वर्षीय मुलगी  व ९ महिन्यांची नात आलेली होती. वर्षभरापासून अनैतिक संबंध जुळलेल्या त्या प्रेयसी व संशयित खान यांच्यात अनैतिक संबंधातून गेल्या काही दिवसांपासून वाद चालू होते. शनिवारच्या दिवशी या दोघात वाद झाल्याने संताप अनावर झालेल्या खान याने रविवारी पहाटेच्या सुमाराला घरात झोपलेल्या प्रेयसीसह तिची मुलगी व ९ महिन्यांच्या नातीला जिवंत पेटवून देत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने ९ महिन्यांच्या सिद्धीचा होरपळून मृत्यू झाला होता तर पिडित व तिची मुलगी या दोघीही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले केले होते. या घटनेनंतर खान पसार झाला होता पोलीसांनी त्याच्या शोधासाठी पथक तयार केले करुन उत्तरप्रदेशला रवाना केले होते.. सुमारे ७० ते ८० टक्के भाजल्याने दोघी मायलेकी गंभीर जखमी असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्या, पिडित प्रेयसीचा मृत्यू मंगळवारी झाला आणि तिची मुलगी प्रितीही गंभीर आहे.

टॅग्स :Murderखूनnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय