शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मित्रपक्षातील फूट कॉँग्रेसच्या पथ्यावर ?

By admin | Updated: August 4, 2015 23:28 IST

मालेगाव : स्थायी समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

मालेगाव : येथील महानगरपालिका स्थायी समिती सभापतिपद निवडणुकीच्या निमित्ताने मनपातील सत्तारूढ तिसरा महाज व त्यांचा मित्रपक्ष यांच्यात फूट पडली आहे. एवढेच नव्हे तर तिसरा महाजलाही भगदाड पडले आहे.तिसरा महाजनेही विरोधी कॉँग्रेसचा मित्र असलेल्या मालेगाव विकास आघाडीला आपल्या गळाला लावले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. सदर निवडणुकीसाठी अर्थपूर्ण घडामोडींनी वेग घेतल्याने कोणाची बोली किती लागते यावर ही निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी हे निश्चित होणार आहे.या निवडणुकीत सर्वप्रथम कॉँग्रेसनेच आघाडी घेतली. मनपातील सत्तारूढ तिसरा महाज - शहर विकास आघाडी व शिवसेना या मित्रपक्षातील नाराजीचा कॉँग्रेसने पुरेपूर फायदा घेतला आहे. महाज व प्रामुख्याने महापौर हाजी मोहंमद इब्राहिम यांच्या कारभारावर नाराज असलेले उपमहापौर युनूस शेख ईसा यांना कॉँग्रेसने आपल्या गळास लावले. तसेच तिसरा महाजमध्येच सभापतिपदावरून चढाओढ सुरू होती. महाजचे संस्थापक माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल यांच्यासोबत पक्षाच्या स्थापनेपासून सावलीसारखे असणारे एजाज उमर हेही महाजमधून फुटून कॉँग्रेसच्या गोटात सामील झाले आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी आपण दावेदार असताना आपणास डावलण्यात आले. कठीण प्रसंगी पक्षाशी व माजी आमदाराशी एकनिष्ट असतानादेखील आपल्या पक्षनिष्ठेचे फळ आपणास न मिळता बाहेरून आलेल्यांना संधी दिली जात असल्याची उमर यांची नाराजी आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे संख्याबळ आजच आठ झाले आहे. गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसने जनता दलाचे केवळ चार नगरसेवक असताना बुलंद एक्बाल यांना विनाशर्त पाठिंबा दर्शविला होता. त्या उपकाराची परतफेड म्हणून जनता दलाने स्थायीत आपणास मदत करावी, अशी कॉँग्रेसची अपेक्षा आहे. मात्र सध्या जनता दलाची भूमिका काठावरची आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेससोबत असणारी मालेगाव विकास आघाडी या निवडणुकीत मात्र विरोधी असलेल्या महाजच्या गोटात सामील झाली आहे. ही महाजसाठी त्यातल्या त्यात समाधानकारक घटना आहे. या सर्वांमध्ये आता शिवसेनेची भूमिका ही निर्णायकी ठरणार आहे. महापौर निवडणुकीत शिवसेनेची तुलनेने ‘स्वस्तातील’ भूमिका ही सर्वात आधी उघड झाली होती. यंदा मात्र शिवसेनेने चतुराई दाखवत आपले पत्ते अजून खुले केलेले नाही. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होते, चिठ्ठी पद्धतीने होते की एकतर्फी होते हे बऱ्याचअंशी शिवसेनेच्या भूमिकेवरच अवलंबून आहे. शेवटी स्थायीची निवडणूक ही पक्ष - विचारसरणीपेक्षा ‘विकासाची’ बोली कोण किती लावतो यावरच ठरणार आहे. (प्रतिनिधी)