शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

गावठाणाच्या क्लस्टरचा मार्ग होणार मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 01:47 IST

गावठाण भागाच्या पुनर्विकास करण्यासाठी महापलिकेच्या वतीने इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि. १७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला असून, त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

नाशिक : गावठाण भागाच्या पुनर्विकास करण्यासाठी महापलिकेच्या वतीने इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव अखेर मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि. १७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला असून, त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या दोन ते तीन दिवसांत कोणत्याही क्षणी आदर्श आचारसहिंता लागू होऊ शकते. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेत घाईघाईने स्थायी समितीची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात गावठाण भागातील क्लस्टरशी संबंधित महत्त्वपूर्वी विषय चर्चेला येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून पावसाळ्यामुळे सतत पडझड होत असून, त्या पार्श्वभूमीवर गावठाण भागातील नागरिकांचे त्याकडे लक्ष लागून आहे.महापालिकेचा शहर विकास आराखडा २०१७ मध्ये मंजूर झाला. यावेळी शहरातील २३ गावठाण वगळता अन्य भागांतील नियमावली मंजूर करण्यात आली होती. गावठाण भागातील जुन्या घरांच्या पुनर्विकासासाठी शासनाने क्लस्टर योजना आखण्यासाठी हा विषय बाजूला ठेवला होता. दरम्यान, शासनाने क्लस्टरचा प्रस्ताव तयार केल्यानंतर उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेच्या दरम्यान, गावठाण भागात ज्यादा एफएसआय दिल्यास लोकसंख्येची घनता वाढेल त्यामुळे त्याचा एकंदर सेवा सुविधांवर काय ताण होईल, याबाबत आघात मूल्यमापन केले पाहिजे, यासंदर्भात उच्च न्यायालयाने एका याचिकेत निर्णय दिले. त्यानुसार आघात मूल्यमापन करण्याचे आदेश गेल्यावर्षीच महापालिकेला देण्यात आले होते. त्यानुसार गेल्यावर्षी निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु प्रतिसाद मिळाला नव्हता.कोट्यवधींची औषध खरेदीमहापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी लागणाºया औषधांसाठी खरेदीचा प्रस्तावदेखील स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.१७) होणाºया सभेत मांडण्यात आला आहे. त्यामुळे औषध खरेदीचा निर्णयदेखील होणार आहे. त्याचप्रमाणे शरणपूर पालिका बाजार येथील लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाला वापरात असलेली जागा वाढीव भाड्यासह मुदतवाढीने देण्याचादेखील प्रस्ताव आहे.महापालिकेने आता त्यासाठी सव्वादोन कोटी रुपये खर्च मंजूर करून निविदा काढल्या होत्या. त्याला चार निविदाधारकांनी प्रतिसाद दिला होता.४क्रिसिल कंपनीची सर्वांत कमी म्हणजेच ६३ लाख ७५ हजार रुपयांची निविदा असून, ती मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी