शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:17 IST

कोरोनाच्या महामारीत जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून बजावलेल्या सेवेबद्दल पंचायत समितीच्या वतीने या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करत त्यांना कालबद्ध पदोन्नती देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

ठळक मुद्देपेठ : सन्मानासह २८ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती; इगतपुरी, चांदवडला स्वागत

पेठ : कोरोनाच्या महामारीत जनतेचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी पेठ तालुक्यातील आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून बजावलेल्या सेवेबद्दल पंचायत समितीच्या वतीने या कोरोनायोद्ध्यांचा सन्मान करत त्यांना कालबद्ध पदोन्नती देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.पेठ तालुका तीन महिन्यांपासून कोरोनापासून दूर होता. मात्र शहरात लागण झाल्याने आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करत घरोघर सर्वेक्षण, आरोग्य तपासणी व उपचार करून कोरोना संक्रमणाची साखळी खंडित करण्यात यश मिळवले. राजबारी येथील आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर चार महिन्यांपासून आरोग्य कर्मचारी सेवा बजावत आहे. गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यातआला. याप्रसंगी डॉ. मोतीलाल पाटील, बाळासाहेब चौधरी, बाळकृष्ण सोनार, रोहिदास जाधव, मधुकर आव्हाड आदी उपस्थित होते.पेठ तालुक्यातील २८ आरोग्य कर्मचाºयांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला असून, नाशिक जिल्ह्यातून पेठ तालुक्याचे सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदींचा समावेश आहे. कोरोनाकाळात प्रशासनाकडून पाठीवर थाप देऊन कोरोनाच्या लढाईसाठी बळ दिल्याची भावना या कर्मचाºयांनी व्यक्त केली.चांदवड : मालेगावमध्ये सेवा दिल्यानंतर चांदवड येथे परतलेल्या डॉ. हितेश महाले यांच्यासह आरोग्य कर्मचाºयांचे स्वागत करण्यात आले. यावेळी निवासस्थानासमोर आकर्षक रांगोळी काढून फटाक्यांच्या आतषबाजी व पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी डॉ. हितेश महाले, डॉ. पुष्कर इंगळे यांचे स्वागत केले. डॉ. प्राची कापडणीस, डॉ. अश्विनी महाले, डॉ. गीता गुंजाळ, कल्पना आहेर, सुलोचना इंगळे आदींनी त्यांचे औक्षण केले. हॉस्पिटल कर्मचारी व डावखरनगर येथील नागरिकांनी त्यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांनी शारिरिक अंतर राखत हा सोहळा पार पाडला.बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचा सन्मानइगतपुरी : कोरोना विषाणूचा धोका वाढू नये तसेच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी मालेगाव येथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाºयांसह वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाºयांचा घोटी पोलीस ठाण्यात सन्मान करण्यात आला. कोरोना विषाणूंचा सामना करताना नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासण्यासाठी पोलीस, डॉक्टर यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे.४कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मालेगाव शहरात चोख बंदोबस्त ठेवणारे पोलीस, डॉक्टर हे कोरोनायोद्धे असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार परमेश्वर कासोळे यांनी याप्रसंगी काढले. यावेळी निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे उपस्थित होते. मालेगाव शहरात बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, मोहित मोरे यांच्यासह घोटी ग्रामीण रु ग्णालयाचे प्रभारी डॉ. अविनाश गोºहे यांना सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य