शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पेस्ट कंट्रोल ठेका अनकंट्रोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:48 IST

डासांवरून रामायण : कंत्राट रद्द न केल्यास आरोग्याधिकाºयांना घरी पाठविणार नाशिक : शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम आहे, परंतु पावसाळा संपला तरी डासांचा उपद्रव कायम आहे. १९ कोटी रुपयांचे पेस्ट कंट्रोलचे कंत्राट देऊनही कोणताही फरक पडलेला नाहीच, शिवाय कुठे फवारणी होत नाही. झाली तर औषधांऐवजी पाण्याची फवारणी केली जात असल्याचे एकेक आरोप करीत मंगळवारी नगरसेवकांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. पेस्ट कंट्रोलच्या या ठेकेदाराला दोन नोटिसा बजावण्यात आल्या असून, आता तिसरी नोटीस देऊन तत्काळ घरी पाठवावेत अन्यथा आरोग्याधिकाºयांना घरी पाठविण्यात येईल, असा सज्जड दमच महापौर रंजना भानसी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देनाशिक : शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम १९ कोटी रुपयांचे पेस्ट कंट्रोलचे कंत्राट

डासांवरून रामायण : कंत्राट रद्द न केल्यास आरोग्याधिकाºयांना घरी पाठविणार

नाशिक : शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम आहे, परंतु पावसाळा संपला तरी डासांचा उपद्रव कायम आहे. १९ कोटी रुपयांचे पेस्ट कंट्रोलचे कंत्राट देऊनही कोणताही फरक पडलेला नाहीच, शिवाय कुठे फवारणी होत नाही. झाली तर औषधांऐवजी पाण्याची फवारणी केली जात असल्याचे एकेक आरोप करीत मंगळवारी नगरसेवकांनी संतापाला वाट मोकळी करून दिली. पेस्ट कंट्रोलच्या या ठेकेदाराला दोन नोटिसा बजावण्यात आल्या असून, आता तिसरी नोटीस देऊन तत्काळ घरी पाठवावेत अन्यथा आरोग्याधिकाºयांना घरी पाठविण्यात येईल, असा सज्जड दमच महापौर रंजना भानसी यांनी दिला आहे.शहरात डेंग्यूचे थैमान कायम असून, त्याला कारणीभूत असलेले डेंग्यू डास कायम असल्याच्या तक्रारी आहेत. १९ कोटी रुपयांचा वार्षिक ठेका देऊनही डासनिर्र्मूलन होत नसल्याने महापौर रंजना भानसी यांनी तातडीची आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती.दुपारी स्थायी समितीच्या दालनात झालेल्या बैठकीस स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेता दिनकर पाटील, आरोग्य व वैद्यकीय समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर आदी उपस्थित होते.

मालप्रॅक्टिस केल्यास असेच होणार...

महापालिकेचे ठेका घेताना ठेकेदार मालप्रॅक्टिस करतात आणि अशाप्रकारे ठेके दिल्यानंतर काम अशाच दर्जाची होणार असल्याचा आरोप सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी केला. पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यात औषधांचा वापर करताना गोंधळ असून, अवघे तीस ते पस्तीस टक्केऔषध असते, बाकी पाणी असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचाºयांच्या हाती स्क्रूड्रायव्हरडास निर्मूलनासाठी कर्मचाºयांना फवारणीची औषधे मिळत नाही, अशी ओरड असतानाच त्याचे समर्थन करीत जीवशास्त्रज्ञ राहुल गायकवाड यांनी कर्मचाºयांना स्कू्र ड्रायव्हर दिल्याचे सांगितले. पावसाळा संपल्याने रस्त्याच्या कडेला किंवा छतावर पाणी साचत नाही तर घरातील फ्रीजच्या पाठीमागील बाजूस पाणी साचते त्यात डेंग्यू पसरवणाºया डासांची उत्पती होते, त्यामुळे कर्मचारी घरोघर जाऊन स्क्रूड्रायव्हरने अशाप्रकारचे फ्रीज तपासत असल्याचे सांगितले.

बैठकीस वैद्यकीय अधीक्षकांची दांडीमहापौरांनी घाईघाईने आरोग्य विभागाची बैठक घेतली असताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. भंडारी यांनी मात्र बैठकीस दांडी मारली. ते प्रभारी आयुक्तांकडे गेल्याचे सांगण्यात आले.  त्यामुळे महापौर भानसी नाराज झाल्या. त्यांनी भंडारी यांना त्वरित बोलविण्याचे आदेश दिले. परंतु मुख्य विषय संपल्यानंतरही ते उपस्थित नव्हते.