शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव आगाराच्या लालपरीला दोन महिन्यांपासून प्रवाशांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:31 IST

लासलगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही लासलगाव आगारातील बसेसला प्रवाशांची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लासलगाव बसस्थानकावर बसेस उभ्या असून, प्रवासीच येत नाही. आगारप्रमुख समर्थ शेळके यांच्यासह आगाराचे कर्मचारी सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. बस- स्थानकावर दररोज २८८ बस फेऱ्या होतात.

लासलगाव : (शेखर देसाई)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही लासलगाव आगारातील बसेसला प्रवाशांची प्रतीक्षा कायम आहे.गेल्या दोन महिन्यांपासून लासलगाव बसस्थानकावर बसेस उभ्या असून, प्रवासीच येत नाही. आगारप्रमुख समर्थ शेळके यांच्यासह आगाराचे कर्मचारी सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. बस- स्थानकावर दररोज २८८ बस फेऱ्या होतात. पंधरा हजार किलोमीटर अंतर लासलगाव बसस्थानकावरून प्रवाशांची ने आण होते. दररोज किमान पाच लाख रुपयांच्या तिकीट विक्र ीतून उत्पन्न होणाºया आगारात सर्व बसेस उभ्या आहेत. दि.२२ मार्चपासून दररोज पाच लाख रुपयांचे उत्पन्न बुडीत होऊन मार्चमध्ये चाळीस लाख, एप्रिल व मे महिन्यात लग्नसराईचे व प्रवास संख्या वाढून दीड कोटीपेक्षा अधिक, तर जून महिन्यात दि.१४ जूनपर्यंत सत्तर लाख रुपयांच्या उत्पन्नास मुकले आहे.लासलगाव बस आगारातून दररोज २८८ फेऱ्यांद्वारे पंधरा हजार किलोमीटर बसेस धावत असून, याद्वारे दररोज पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. १५ एप्रिलपर्यंत सेवा बंद राहणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने २२ मार्चपासून एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.----------------------बस आगाराच्या वतीने गेले सात दिवस लासलगाव येथून चांदवड, मनमाड, निफाड, येवला व सिन्नर या गावांकरिता बसेस प्रवासी वर्गाकरिता लासलगावच्या बसस्थानकावर उभ्या आहेत, परंतु प्रवासी नाहीत अशी उलटी स्थिती आहे. गजबजून जाणाºया लासलगाव येथील बसस्थानकावर आता मालवाहतूक सेवाही उपलब्ध आहे.----------------------------लासलगाव बसस्थानकावरून निफाड, चांदवड, येवला व मनमाड तसेच लासलगाव परिसरातील काही खेडेगावात बस प्रवासी उपलब्ध होत असतीलतर त्यांना सोडण्यासाठी नियोजन आहे. एका बाकावर एकच प्रवासी, सॅनिरायझर्सचा वापर, मास्कसह प्रवासी प्रवास या अटींवर करू शकणार आहेत. प्रवाशांनीबससेवेचा वापर करणे आवश्यक आहे.- समर्थ शेळके, आगारप्रमुख

टॅग्स :Nashikनाशिक