शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

माजी सैनिकांच्या मिळकतींना अर्धवट कर माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:48 IST

नाशिक : माजी सैनिक आणि सैनिक विधवा पत्नी यांना महापालिकेच्या मिळकत करात सूट देण्याचा विषय अखेरीस मार्गी लागल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अधिनियमातील त्रुटींमुळे त्यांना अर्धवटच सवलत मिळणार आहे.

ठळक मुद्देमहासभेत प्रस्ताव: शासकीय कराची आकारणी करणारच

नाशिक : माजी सैनिक आणि सैनिक विधवा पत्नी यांना महापालिकेच्या मिळकत करात सूट देण्याचा विषय अखेरीस मार्गी लागल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अधिनियमातील त्रुटींमुळे त्यांना अर्धवटच सवलत मिळणार आहे.

महापालिकेच्या करात त्यांना सवलत मिळणार असली सरकारी कर मात्र भरावाच लागणार असून तसा प्रस्ताव महासभेच्या पटलावर मांडण्यात आला आहे. शहरात राहणारे माजी सैनिक आणि सैनिकांच्या विधवा पत्नी यांना घरपट्टीत सरसकट सूट मिळावी, अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे.

देशातील आणि राज्यातील काही महापालिकांनी अशी मिळकत कराची माफी दिली आहे. नाशिक महापालिकेनेदेखील महासभेत ठराव केल्यानंतर राज्य शासनाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजनेंतर्गत ही मान्यता देण्यात आली असून त्यानुसार माजी सैनिकाच्या एकाच मिळकतील सूट देण्यात येणार आहे.अर्थात, महापालिकेच्या घरपट्टीत (मिळकत कर), पाणी पट्टी, पाणी पट्टी लाभ कर, मलनिस्सारण कर, मल निस्सारण कर, सर्वसाधारण कर, शिक्षण उपकर, पथकर व सुधार आकार यांचा समावेश होते. तर महापालिकेच्या करा व्यतिरिक्त सरकारी शिक्षण कर व रोजगार हमी कर तसेच महाराष्ट्र टॅक्स ऑन बिल्डिंग अधिनियमनुसार कर मिळकतींवर कर आकारले जातात.मात्र, शासन निर्णयात शासकीय कर तसेच आग निवारण कर व वृक्ष संवर्धन कर यावर सूट देण्याबाबत नमूद नसल्याने सदरचे कर वगळता इतर करांवर सूट देता येणार आहे. आगामी आर्थिक वर्षात म्हणजेच २०२१-२२ या आर्थिक वर्षात सवलत लागू करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या १७ मार्च रोजी होणाऱ्या महासभेत सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार