शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

ओझर गांवातील बसस्थानक बनले पार्किंग तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:03 IST

ओझरटाऊनशिप : मुंबई आग्रा महामार्गावरील बसस्थानक सुरू होण्याच्या प्रतिक्षेत तर जुने बसस्थानक खाजगी वाहनधारकांचे पार्किंग तळ बनले आहे. शौचालय व स्वच्छतागृहात जाण्यासाठी मोकळी वाट नसते त्यामुळे वाट काढीत जावे लागते.

ठळक मुद्देविमाननगर येथेच अंडरपास हवा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

ओझरटाऊनशिप : मुंबई आग्रा महामार्गावरील बसस्थानक सुरू होण्याच्या प्रतिक्षेत तर जुने बसस्थानक खाजगी वाहनधारकांचे पार्किंग तळ बनले आहे. शौचालय व स्वच्छतागृहात जाण्यासाठी मोकळी वाट नसते त्यामुळे वाट काढीत जावे लागते.नाशिककडून पिंपळगांव बाजूकडे व पिंपळगांव कडून नाशिककडे जाणाऱ्या बहुतेक बसेस ओझर बसस्थानकात येतच नाही आणि नाशिकहुन येतांना पिंपळगांव बस वगळता बहुतेक बस मध्ये कंडक्टर कडून नकार दिला जातो. त्या मुळे सिटी बसेस व इतर तुरळक बसेस येण्यासाठी वापर होतो सकाळ संध्याकाळ तर वाहनेच पार्क. केलेली आढळतात असे अनेकांनी सांगितले.नवीन बसस्थानक सुसज्ज असले तरी परवानगीच्या प्रतिक्षेत अडकून पडल्याची चर्चा आहे प्रभूधामकडे नवीन बसस्थानकात जाण्यासाठी आग्रारोडला कट नाही की लांबपल्त्याच्या येणाºया-जाणाºया महामंडळाच्या बसला नासिककडून जाणाºया बस वगळता विमानगरजवळ तर पिंपळगावकडून नाशिकला जाणाºया बसला टर्नमारून, एचएएलच्या मुख्यगेटच्या अंडरपासने बसस्थानकावर जावे लागेल.गांवासाठी बसथांबा हा धन्वंतरी हॉस्पीटल ते गडाखकॉर्नर सिर्वसरोडलगत केला तरच ओझरगावातील उपनगरातील लोकांनाही सोयीचे होईल. महामार्ग पूर्णत्वावर येईल तेव्हा अंडरपासने बसस्थानकावर फिरून यावे लागेल ट्राफिक जामचा प्रश्न उद्भवेल.सध्या ओव्हरब्रीजचे काम जलद गतीने सुरू आहे. यात ओझर बसस्थानकाच्या समोरील बाजुने बससाठी युटर्न मारून प्रवाशांना येजा करण्यास बसस्थानक योग्य राहिल त्यासाठी विमाननगर येथेच अंडरपास हवा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.सीटी बसची कपात झाल्यामुळे लाबपल्याच्या महामंडळाच्या बससाठी प्रवाशांना रोडवर उभे रहावे लागते, नवीन बस स्थानकावर एसटी बस थांबल्या तर प्रवासी सुखावतील.आम्ही एस टी महामंडळाला बसपास काढतांना अ‍ॅडव्हान्स पैसे भरतो, पण टाऊनशिप ओझरमार्गे नाशिकला जाणारी सिटी बसही उपनगरातील बसथांब्यावर न थांबता पुढे जातात.विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजसाठी जाण्यास उशीर होतो, यामुळे घरातुन खुप अगोदर निघावे लागते. हीच गत त्यांची घरी परततांना होते. याचबरोबर बºयाचदा सकाळी ९ नंतर येणाºया बस एकामागुन एक काहीही अंतर न ठेवता ये जा करीत असतात सद्यातरी खाजगी वाहनांसाठी वाहनतळ बनले असल्याचे निर्दर्शनास येत आहे. बसस्थानक स्थलांतरानंतर तरी अनेक प्रश्र मार्गी लागो हीच अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहेत.. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीOzarओझर