शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णकांत भाजीमार्केटला वाहनतळाची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:36 IST

कलानगर येथील कृष्णकांत भाजीमार्केटला वाहनतळाची सोय नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने वाहनतळाची सोय करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : कलानगर येथील कृष्णकांत भाजीमार्केटला वाहनतळाची सोय नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने वाहनतळाची सोय करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.कलानगर परिसरात सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपासून भाजीमार्केट नसल्याने भाजीविक्रे ते सर्रासपणे रस्त्यावर बसत होते. इंदिरानगरमधील मध्यवर्ती सावरकर चौक ओळखला जातो. वडाळा-पाथर्डी रस्त्यावर असलेला सावरकर चौक ते राजसारथी सोसायटी या रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते बसत असे. त्यामुळे त्यांच्याकडे येणारे ग्राहक सर्रासपणे रस्त्यावर वाहने उभी करीत होती. त्यामुळे वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून मार्गक्र मण करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असे. त्यातूनच दररोज लहान-मोठ्या अपघातांच्या घटना घडत होत्या. तसेच पादचाऱ्यांना मार्गक्र मण करणेसुद्धा मुश्किल झाले होते. त्रस्त नागरिकांनी रस्त्यावरील भाजीबाजार हटवण्याची मागणी केली असता त्याची दखल घेत सुमारे १५ वर्षांपूर्वी महापालिकेच्या वतीने कलानगर येथे कृष्णकांत भाजीबाजार बांधण्यात आला. यामध्ये सीमेंटची ओटे बांधून यावर सुमारे ७५ भाजीविक्रे ते व्यवसाय करू शकतील, अशी सोय करण्यात आली आहे. तसेच पाऊस व उन्हापासून बचाव होण्यासाठी पत्र्याचे शेड टाकण्यात आले. आज त्या ठिकाणी सुमारे ४५ भाजीविक्री व्यवसाय करतात. सायंकाळी परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिक भाजी खरेदी करण्यासाठी येतात. परंतु या ठिकाणी वाहनांची सोय नसल्याने भाजीबाजाराच्या बाहेर असलेल्या कॉलनी रस्त्यावरच सर्रासपणे वाहने लावली जातात. कलानगरमध्ये जाणाºया वाहनधारकांना व पादचाºयांना मार्गक्र मण करताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच लहान-मोठे अपघात होऊन हमरीतुमरीच्याही घटना घडत आहे.परिसरातील नागरिक त्रस्तकृष्णकांत भाजीबाजाराच्या चारही बाजूने रो-हाउसेस व अपार्टमेंट आहेत. या ठिकाणी वाहनांची सोय नसल्याने भाजीबाजाराच्या बाहेर असलेल्या कॉलनी रस्त्यावरच सर्रासपणे वाहने लावली जातात. त्या ठिकाणी येणारी वाहने कॉलनी रस्त्यावर लागत असल्याने परिसरातील नागरिकांना घराच्या बाहेर निघणे तसेच वाहने काढणेसुद्धा मुश्किल झाले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMarketबाजार