शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

सेवाव्रती संशोधक देशमुख दांपत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:41 IST

घरातच संस्काराचं विद्यापीठ असले की अन्य कुठल्याही उपदेशांची गरज भासत नाही. नाशिकच्या डॉ. आशिष देशमुख यांनाही सुदैवाने ह्या विद्यापीठातून संस्काराचे धडे गिरविता आले. मूळ विदर्भातील असलेले यशवंतराव देशमुख यांची संत गाडगेबाबांशी भेट झाल्यावर ते बाबांच्या सांगण्यावरून सर्व संपत्तीचा त्याग करत १९४०च्या सुमारास नाशिकला आले. बाबांनी त्यांच्यावर धर्मशाळेचा कार्यभार सोपविला. पूर्ण आयुष्य लोकसेवेत घालवणाऱ्या यशवंतरावांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव अशोकराव देशमुख यांनीही तोच वारसा पुढे चालविला.

ठळक मुद्दे गाडगेबाबांच्या सेवाकार्यात हातभार लावत असतात

घरातच संस्काराचं विद्यापीठ असले की अन्य कुठल्याही उपदेशांची गरज भासत नाही. नाशिकच्या डॉ. आशिष देशमुख यांनाही सुदैवाने ह्या विद्यापीठातून संस्काराचे धडे गिरविता आले. मूळ विदर्भातील असलेले यशवंतराव देशमुख यांची संत गाडगेबाबांशी भेट झाल्यावर ते बाबांच्या सांगण्यावरून सर्व संपत्तीचा त्याग करत १९४०च्या सुमारास नाशिकला आले. बाबांनी त्यांच्यावर धर्मशाळेचा कार्यभार सोपविला. पूर्ण आयुष्य लोकसेवेत घालवणाऱ्या यशवंतरावांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव अशोकराव देशमुख यांनीही तोच वारसा पुढे चालविला.गोरगरिबांना अन्नदान, वस्रदान, व्यसनमुक्तीचा संदेश, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत असे वेगवेगळे कार्य आशिष यांनीही जवळून पाहिले आणि त्यात सहभागही नोंदविला. एकीकडे गाडगेबाबांच्या कार्याचे सेवाव्रत आणि दुसरीकडे शिक्षण असे दोन्ही कार्य लहानपणापासूनच योग्यतेने पुढे नेत आशिष यांनी प्राथमिक शिक्षण पेठे विद्यालयात तर बी. फार्मसीची पदवी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या महाविद्यालयात संपादन केली. पुढील शिक्षणासाठी वेगवेगळ्या परीक्षा देत असतानाच आशिष यांना अमेरिकेतील शिष्यवृत्ती प्राप्त झाली.आशिष यांनी अमेरिकेत जाऊन तेथील ह्यूस्टन टेक्सास येथील टेक्सास ए अ‍ॅण्ड एम. युनिव्हर्सिटीत कॅन्सरवर संशोधन करत पीएच.डी. आणि मास्टर पीएच.डी.ही प्राप्त केली. त्यात त्यांनी जगप्रसिद्ध कॅन्सर हॉस्पिटल एम.डी. अ‍ॅण्डरसन कॅन्सर सेंटर ह्यूस्टन टेक्सास येथे कॅन्सरपासून बचाव कसा करावा यावर संशोधन केले. त्यामुळे आशिष यांना सन २०१६ मध्ये एम.डी. अ‍ॅण्डरसनचा आउटस्टॅण्डिंग पोस्ट डॉक्टरेल कॅन्सर प्रिव्हीएशन पुरस्कारही मिळाला. अमेरिकन युनिर्व्हसिटीमार्फतही पुरस्कार प्राप्त झाले. सन २०१८ मध्ये त्यांना सीएनएन न्यूजतर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सध्या आशिष हे युनिव्हर्सिटी आॅफ टेक्सास येथे प्रोफेसर आणि संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या संशोधनाची दखल म्हणून त्यांचे लेख अमेरिकन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय, अमेरिकन वाहिन्यांवरही त्यांच्या मुलाखती प्रदर्शित झाल्या आहेत. नाशिक येथीलच डॉ.कल्याणी सोनवणे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यासुद्धा त्याच विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही कॅन्सरपासून बचाव करण्यासाबाबत आणि कॅन्सर कमी खर्चात कसा बरा होईल, याबाबत संशोधन करत आहेत. अमेरिकेत राहूनही आशिषने आपल्या पिढीतून आलेला लोकसेवेचा वसा पुढे चालू ठेवला आहे.नाशिकच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांकरिता शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी दरवर्षी त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याकरिता आर्थिक मदत पाठविली जाते. सेवाभाव हा पिंड असल्याने गोरगरिबांसाठी अन्नदान व्हावे याकरिता अमेरिकेतून जमेल तशी देणगी नाशिकच्या गाडगे महाराज धर्मशाळेला पाठवित असतात. अमेरिकेतसुद्धा देशमुख पती-पत्नीने सोशल ग्रुप तयार करून विविध भारतीय नागरिकांमार्फत वेगवेगळ्या समाजसेवेची कामे, शैक्षणिक कामे कशा प्रकारे राबविता येतील, त्यांचा आपल्या मातृभूमीला कशा प्रकारे उपयोग होईल यासाठी हे दांपत्य धडपडत असते. गाडगे बाबांचे तत्त्व न विसरता आपले जे काही जीवन सेवा कार्यात खर्च करता येईल, त्यासाठी देशमुख दांपत्य सदैव सक्रिय राहत आले आहे. परदेशात राहूनही त्यांची नाशिकशी नाळ जुळलेली आहे आणि नाशकात आल्यावरही आपले बंधू कुणाल देशमुख यांच्या सोबत ते गाडगेबाबांच्या सेवाकार्यात हातभार लावत असतात.