शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

परीट-धोबी समाज संघटनेत फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 00:59 IST

कसबे-सुकेणे : परिट-धोबी समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेत फूट पडली असून, राज्यातील समाजबांधवांच्या भावनांचा आदर व आरक्षणाचा प्रश्न सुटावा याकरिता जोमाने संघटन व्हावे, यासाठी आम्ही राज्यपातळीवर नवी संघटना कार्यरत करीत असल्याची घोषणा शुक्रवारी नागपूर येथील समाजाचे ज्येष्ठ नेते देवराज सोनटक्के व अकोल्याचे अनिल शिंदे यांनी नाशिकमध्ये केली.

कसबे-सुकेणे : परिट-धोबी समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेत फूट पडली असून, राज्यातील समाजबांधवांच्या भावनांचा आदर व आरक्षणाचा प्रश्न सुटावा याकरिता जोमाने संघटन व्हावे, यासाठी आम्ही राज्यपातळीवर नवी संघटना कार्यरत करीत असल्याची घोषणा शुक्रवारी नागपूर येथील समाजाचे ज्येष्ठ नेते देवराज सोनटक्के व अकोल्याचे अनिल शिंदे यांनी नाशिकमध्ये केली.नाशिक येथील गंगापुर रोडवरील बालाजी लॉन्सवर परिट- धोबी समाजाची प्रदेश कार्यकारीणी बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटनेतील अंतर्गत मतभेद, प्रदेशाध्यक्ष यांच्या कडुन मिळणाऱ्या वागणुकीला कंटाळून व समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आणि समाज संघटन बळकटपणे व्हावे, सध्याच्या प्रदेशाध्यक्षाांबद्दल राज्यभर असलेली नाराजी आणि राज्यातील समाजबांधवांच्या मागणी नुसार या संघटनेला रामराम ठोकत विदर्भातील जेष्ठ नेते देवराज सोनटक्के, आरक्षण कृती समितीचे अनिल शिंदे, दिलीप शिरपूरकर, रु पेश मोतीकर, पुण्याचे कुमार शिंदे , नाशिकचे मनोज म्हस्के, मुंबईचे रविंद्र जाधव, वर्धाचे अशोक लोणकर, अमरावतीच्या वैशाली केळझरकर यांनी प्रदेश कार्यकारीणी बैठकीत राजीनामे देत सोमेश्वर मंदिरात नवीन संघटना स्थापन करण्याची घोषणा केली. सर्व भाषीक परीट- धोबी समाजाचे आगामी काळात संघटन करीत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्वरीत सुटावा याकरीता प्रयत्नशील राहु, असे प्रतिपादन यावेळी देवराज सोनटक्के यांनी व्यक्त केले.यावेळी हरीश मस्के, मनोज दुधांडे, चंद्रकांत थुकेकर , सुनील पवार, सचिन कदम, चेतन शिंदे, अरु णा रायपुरे ,गणेश खर्चे , महादेव इडोकार ,अजय सोनोने , दिलीप बोरसे ,विवेक पवार, मराठा परिट समाज सेवा मंडळाचे संजय राजगिरे, कैलास गवळी, सुधाकर रंधे, भानुदास गायकवाड आदी उपस्थित होते.मराठा-परिट समाजाचे समर्थन नाशिकमधील सर्वात मोठ्या मराठा-परिट समाज सेवा मंडळाने नवीन संघटना घोषणेचे स्वागत करीत देवराज सोनटक्के व अनिल शिंदे यांचा सत्कार केला. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र प्रदेश मराठा परिट समाज सोनटक्के व शिंदे यांच्या नेतृत्वाला समर्थन देत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत राऊत, महासचिव विलास जोवेॅकर यांनी दिली.

टॅग्स :communityसमाजNashikनाशिक