शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आईपासून दुरावलेल्या ‘त्या’ बछड्याला लाभले पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:12 IST

काही दिवसांपूर्वी शहरातील सिन्नर फाटा भागात एका उसाच्या शेतात आढळून आलेल्या मादी बछड्याला आईने स्वीकारणे पसंत केले नाही. त्यामुळे त्याची रवानगी बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात करण्यात आली. या मादी बछड्याला ‘बिट्टू’ नावाच्या मित्राबरोबरच आता पालकही लाभले आहेत. वर्षभरासाठी उदरभरण आणि वैद्यकीय खर्चाचा प्रश्नही सुटला असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.

नाशिक : काही दिवसांपूर्वी शहरातील सिन्नर फाटा भागात एका उसाच्या शेतात आढळून आलेल्या मादी बछड्याला आईने स्वीकारणे पसंत केले नाही. त्यामुळे त्याची रवानगी बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात करण्यात आली. या मादी बछड्याला ‘बिट्टू’ नावाच्या मित्राबरोबरच आता पालकही लाभले आहेत. वर्षभरासाठी उदरभरण आणि वैद्यकीय खर्चाचा प्रश्नही सुटला असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.शहरात २९ जानेवारी रोजी पळसे येथील एका उसाच्या शेतात ऊसतोडणीदरम्यान आढळून आलेल्या दोन पिलांपैकी एका पिलाला त्याची आई घेऊन गेली, मात्र सलग दोन दिवस प्रयत्न करूनही तिने पुन्हा हजेरी लावून दुसऱ्या मादी पिलाला स्वीकारले नाही. यामुळे या पिलाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर वनविभागाने पुनर्भेटीचा प्रयोग थांबविला. त्यानंतर तत्काळ त्या मादी बछड्याला बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात संगोपनासाठी हलविले. तेथे या मादी पिलाची भेट येऊरच्या जंगलातून अशाच पध्दतीने आलेल्या बिबट्याच्या नर बछड्यासोबत झाली. या बछड्याला उद्यानाकडून ‘बिट्टू’ तर नाशिकच्या मादी पिलाला ‘दीदी’ अशी नावे देण्यात आली. बिट्टू अन् दीदीची चांगलीच गट्टी जमली आहे. दोघेही जवळपास सारख्याच वयाचे असल्यामुळे त्यांचा एकाकीपणा दूर झाला आणि हळूहळू शरीरही सुदृढ होऊ लागले आहे. अडीच महिन्यांत दीदीचे वजन ११०० ग्रॅमवरून अडीच किलो इतके झाले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या