शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

पाल्या बाबतीत आई वडिलांनी दक्ष रहाण्याची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 19:43 IST

त्र्यंबकेश्वर : आई आपले बाळ पोटात असल्यापासून मोठं होइपर्यंत सारं काही आपल्यासाठी करते. आपण जन्माला आल्यावर आपल्यासाठीच भरड खाते. पण मुलं मोठी झाल्यावर आई बापाचे ऐकत नाहीत. प्रेम प्रकरणे करतात. नको ते थेरं करतात. याबाबतीत मुलींनीही सावध रहाणे गरजेचे आहे. असे मत राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या प्रभावती तुंगार यांनी त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रभावती तुंगार : ‘आई कॉलेजच्या दारी’ कार्यक्र मात मान्यवरांचे मनोगत

त्र्यंबकेश्वर : आई आपले बाळ पोटात असल्यापासून मोठं होइपर्यंत सारं काही आपल्यासाठी करते. आपण जन्माला आल्यावर आपल्यासाठीच भरड खाते. पण मुलं मोठी झाल्यावर आई बापाचे ऐकत नाहीत. प्रेम प्रकरणे करतात. नको ते थेरं करतात. याबाबतीत मुलींनीही सावध रहाणे गरजेचे आहे. असे मत राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या प्रभावती तुंगार यांनी त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारकसंस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘आई कॉलेजच्या दारी’ या कार्यक्र मात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ तर प्रा. सुरेश देवरे, प्रा. चंद्रकांत खैरनार, प्रा. माधव खालकर, प्रा. डॉ. छाया शिंदे, प्रा. निता पुणतांबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. रसाळ म्हणाले की, देवाला सर्वत्र जाता आले नाही, म्हणून आईचे रूप धारण करून तो घराघरात गेला आणि आपणासर्वांचे भरण पोषण केले. प्रेमाचा रस्ता पोटातून जातो. म्हणून सर्व मुलींनी भविष्यात एक चांगली माता होऊन दाखवावे असे आवाहन केले. ‘आई कॉलेजच्या दारी’ या उपक्र मातील प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.छाया शिंदे म्हणाल्या की, प्रत्येक आई आपल्या पाल्याला महान बनविण्याचे स्वप्न पाहते. ओबड धोबड दगडातून मूर्तिकार सुंदर शिल्प बनवतो, तसंच आपली मुलं घडवणं हीच आपली भक्ती असते. आपल्या पाल्याचा आहार, विहार, आरोग्य त्याची शारीरिक, मानसिक शक्ती वाढविण्यासाठी योग्य ते उपाय करणं, वाचन, त्यांच्या सवयी, सुसंवादी भूमिका याकडे आयांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. असे विचार मांडले.दुसऱ्या वक्त्या प्रा. नीता पुणतांबेकर यांनी आपल्या मनोगतातुन लग्न संस्थेचे उपकार स्पष्ट करून कळी उमलताना या विषयावर संवेदनांचे महत्व सांगितले.या कार्यक्र मात प्रतिमा पूजनानंतर प्रा. शीतल गायकवाड यांनी प्रास्ताविकातून उपक्र माचा हेतू स्पष्ट केला. प्रा. शाश्वती निभरवणे यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुजाता गडाख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राजश्री शिंदे यांनी केले.(फोटो १९ त्र्यंबक)