शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जातपडताळणीसाठी पालक व  विद्यार्थ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:46 IST

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंतशास्त्र वगळता अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असतानाही जातपडताळणीसाठी पालक व विद्यार्थी धावाधाव करीत आहेत.शहरातील काही पालक आणि विद्यार्थ्यांनी आमदार योगेश घोलप यांच्यासह जातपडताळणी समिती कार्यालयात धाव घेऊन उपायुक्तांची भेट घेत प्रमाणपत्र वेळेत देण्याची मागणी केली.विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना ...

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंतशास्त्र वगळता अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला असतानाही जातपडताळणीसाठी पालक व विद्यार्थी धावाधाव करीत आहेत.शहरातील काही पालक आणि विद्यार्थ्यांनी आमदार योगेश घोलप यांच्यासह जातपडताळणी समिती कार्यालयात धाव घेऊन उपायुक्तांची भेट घेत प्रमाणपत्र वेळेत देण्याची मागणी केली.विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतानाच जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्याचा ऐनवेळी निर्णय घेतल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला  होता.संचालनालयाच्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती होती. तसेच प्रमाणपत्राची ही अट जाचक असल्याची ओरडही पालकांकडून केली जात होती. त्यामुळे शालेय आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंतशास्त्र वगळता इतर अभ्यासक्रमांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला जात असल्याचे स्पष्ट केले.परंतु अशातही पालकांकडून जातपडताळणीसाठी धावाधाव केली जात असल्याने समितीच्या कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांच्या रांगा लागताना दिसत आहेत. दरम्यान, आमदार घोलप यांनी समितीच्या उपायुक्त वंदना कोचुरे यांची भेट घेऊन तातडीने प्रमाणपत्र दिले जावेत, कुठल्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये अशा संबंधितांना सूचनाकेल्या. उपायुक्त कोचुरे यांनीदेखील समितीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वेळेत प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.हजारो प्रकरणे निकालीजातपडताळणी समितीकडे नऊ हजार सातशे प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील मे अखेरपर्यंत सात हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. उर्वरित प्रकरणे अर्जदारांच्या त्रुटीमुळे प्रलंबित असून, समितीकडून संबंधितांना एसएमएसद्वारे सूचित केले जात आहे. अर्जदारांनी त्रुटी वेळेत पूर्ण केल्यास काही तासांतच त्यांना प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

टॅग्स :educationशैक्षणिकCaste certificateजात प्रमाणपत्र