शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

म-हळच्या खंडेरायाला पांगरीकरांचा मानाचा रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:12 IST

शैलेश कर्पे/सिन्नर : प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील म-हळ परिसरातील तीन गावातील ग्रामस्थ गाव बंद करुन देवभेटीसाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे आज शुक्रवार (दि. ११) रोजी रवाना होत आहेत.

शैलेश कर्पे/सिन्नर : प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील म-हळ परिसरातील तीन गावातील ग्रामस्थ गाव बंद करुन देवभेटीसाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे आज शुक्रवार (दि. ११) रोजी रवाना होत आहेत. या अनोख्या सोहळ्यासाठी पांगरीकरांनी मानाचा आकर्षक रथ बनविला असून त्यात देव विराजमान करण्यात येणार आहे. त्यानंतर रथासह म-हळ परिसरातील हजारों ग्रामस्थ जेजुरीकडे रवाना होणार आहेत. प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाºया म-हळ येथील यात्रोत्सवात व जेजुरीच्या देवभेटी सोहळ्यात पांगरीकरांच्या रथाला विशेष मान असतो. पांगरीचा रथ गेल्याशिवाय यात्रोत्सवात किंवा जेजुरीच्या देवभेटीच्या सोहळ्याच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होत नाही. जेजुरी वारीसाठी पांगरी ग्रामस्थांनी सागवानी नवीन रथ बनविला आहे. म-हळ बुद्रुक, म-हळ खुर्द व सुरेगाव येथील ग्रामस्थ आपल्या लाडक्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी सहा दिवस गाव बंद करुन जेजुरीला जाणार आहेत. जेजुरीच्या खंडेरायाला या गावातील ग्रामस्थ कधी एकट्यादुकट्याने किंवा कुटुंबासमवेत जात नाही. तर सर्व ग्रामस्थ एकाचवेळी आपल्या घरांना टाळा ठोकून पालखीची देवभेट घडविण्यासाठी जेजुरीला जात असतात. गेल्या अनेक पिढ्यांपासून मºहळकरांनी कुलदैवतेच्या भेटीची आपली आगळीवेगळी परंपरा जपली आहे. यासाठी पांगरीकरांनी खास सागवानी रथ बनविला आहे. मºहळकरांना तब्बल पाच वर्षानंतर कुलदैवतेच्या दर्शनाचा योग आला आहे. यापूर्वी २००७ साली हजारों मºहळकर शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन व घरांना कुलूप लावून जेजुरीला गेले होते. त्यानंतर २०१३ व आता २०१८ साली हा योग मºहळकरांच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे या सोहळ्यासाठी पांगरीकरांनी ७५ घनफूट सागवान वापरुन पाथरे येथील सोमवंशी बंधूंकडून आकर्षक असा रथ बनवून घेतला आहे. लोकवर्गणीतून पांगरी ग्रामस्थांनी सुमारे ५ लाख रुपयांचा निधी जमा केला. त्यातून हा आकर्षक रथ साकारण्यात आला आहे.----------------दोन महिन्यांपासून रथ बनविण्याचे कामपांगरी, मºहळ ब्रुद्रूक, म-हळ खुर्द, सुरेगाव व परिसरातील ग्रामस्थांची मºहळच्या खंडेरायावर खूपच भावना आहे. मºहळचा यात्रोत्सव असो की जेजुरीचा देवभेटीचा योग यात पांगरीच्या रथाला विशेष मान असतो. त्यामुळे पांगरीकरांनी यावर्षी जेजुरीच्या वारीसाठी आकर्षक सागवाणी रथ बनविला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वीच पांगरीकरांनी लोकवर्गणी जमा करुन रथ बनविण्याच्या कामास प्रारंभ केला होता. रथ पूर्ण झाला असून जेजुरीला जाण्यासाठी सज्ज झाला आहे.-------------------पांगरीत रथाची मिरवणूकम-हळचा यात्रोत्सव असो की जेजुरीचा देवभेटीचा योग. पांगरी येथे रथाची भव्य मिरवणूक काढली जाते. गुरुवारी सायंकाळी पांगरी ग्रामस्थांनी या आकर्षक सागवाणी रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढली. पुढे बैलाची जोडी व सागवाणी रथात खंडेरायाची पालखी ठेवून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रथ म-हळकडे रवाना झाला. शुक्रवारी सकाळी ९ वाजता मºहळ येथून रथ जेजुरीकडे प्रस्थान करणार आहे. पुढे रथ आणि त्यामागे मºहळकरांच्या वाहनांचा ताफा असणार आहे. शुक्रवारी रात्री श्री क्षेत्र आळंदी येथे मुक्काम होईल. रविवारी जेजुरी मुक्काम होणार आहे. देवभेटीनंतर रथासह वारीत सहभागी झालेल्या भाविकांचे मंगळवारी पुन्हा पांगरी येथे आगमन होईल. त्यानंतर सर्वांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.

 

टॅग्स :Nashikनाशिक