शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

पांझरापोळ संस्थेने वीज बिलाचे थकीत ५४ लाख भरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 19:22 IST

पांझरापोळ संस्थेने १९७५ व ७७ साली वीज मंडळाच्या पंचवटी उपविभागाकडून ३ फेजच्या दोन वीज जोडण्या घेतल्या होत्या. त्यातील एक चिलिंग प्लॅन्टसाठी व एक शेतीपंपासाठी होती. या दोन्ही जोडण्यासाठी घरगुती वापराचे वीज देयक अदा केले जात असताना

ठळक मुद्देतब्बल २२ वर्षांनंतर निकाल : नोटीस बजावताच कार्यवाहीन्यायालयाने सन २००५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विजेचा वाणिज्य वापर करून साडेतीन लाख रुपये जादा वीज वापराचे भरण्यास नकार देणाऱ्या पांझरापोळ संस्थेने तब्बल २२ वर्षे वीज मंडळाच्या विरोधात न्यायालयीन लढा देऊनही पदरी अपयश पडले असून, जिल्हा न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या दाव्याचा नुकताच निकाल लागून पांझरपोळ संस्थेने ५४ लाख रुपये भरावे, असे आदेश दिले आहेत.

पांझरापोळ संस्थेने १९७५ व ७७ साली वीज मंडळाच्या पंचवटी उपविभागाकडून ३ फेजच्या दोन वीज जोडण्या घेतल्या होत्या. त्यातील एक चिलिंग प्लॅन्टसाठी व एक शेतीपंपासाठी होती. या दोन्ही जोडण्यासाठी घरगुती वापराचे वीज देयक अदा केले जात असताना वीज मंडळाच्या भरारी पथकाने १९८६ मध्ये अचानक पांझरापोळच्या वीज वापराची तपासणी केली असता, पांझरापोळ संस्थेकडून विजेचा वापर वाणिज्यसाठी केला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे वीज मंडळाने वीज वापराबाबत पांझरापोळ संस्थेला साडेतीन लाख रुपयांचे फरकाचे बिल दिले होते. पांझरापोळ संस्थेने वीज मंडळाच्या या वाढीव बिलाला विरोध दर्शवून थेट न्यायालयात धाव घेतली होती. पांझरापोळ संस्थेत बसविण्यात आलेले वीज मीटर नादुरुस्त असल्याने वीज मंडळाने पांझरापोळचा वीजपुरवठा खंडित करू नये, असा दावा १९९७ मध्ये दाखल केला होता. या दाव्याचा निकाल २००५ मध्ये लागला. त्यात वीज मंडळाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात पांझरापोळने थेट उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविण्यासाठी अपील दाखल केले. परंतु उच्च न्यायालयाने न्यायकक्षाच्या मुद्द्यांच्या आधारे सदरचे अपील जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केल्यानंतर त्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्यासमोर झाली. त्यात वीज मंडळाकडून अ‍ॅड. मनोजकुमार हगवणे पाटील यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला असता न्यायालयाने सन २००५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला. दरम्यान, तब्बल २२ वर्षे खटला न्यायालयात सुरू असल्यामुळे पांझरापोळ संस्थेकडे थकीत असलेले साडेतीन लाख रुपयांची रक्कम दंड, व्याजासह ५४ लाखांपर्यंत पोहोचली. जिल्हा न्यायालयाचा निकाल वीज मंडळाच्या बाजूने लागल्यानंतर तत्काळ वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रवीण दलोरी यांनी पांझरापोळ संस्थेला नोटीस पाठवून थकीत ५४ लाख रुपये भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. या नोटिसीनंतर संस्थेने तत्काळ ५४ लाख रुपयांचा भरणा केला.

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक