देवळा : तालुक्यातील दहिवड व वाखारी येथे शनिवारी रात्री घरफोडीच्या एकाच दिवशी सात घटना घडल्याने, ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण आहे. बंद घरे फोडण्याचे धोरण चोरट्यांनी अवलंबले असल्याचे दिसून येते. यातील फक्त एकाच चोरीच्या घटनेची नोंद देवळा पोलिसांत झाली आहे.दहिवड येथे एकाच गल्लीतील तीन घरांमध्ये घरफोडी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या तीनही कुटुंबातील व्यक्ती बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी कापून चोरी केली आहे. अरुणा यशवंत कापडणीस यांनी देवळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घरातील ५२ हजार रुपये रोख रक्कम (एकूण दोन हजारांच्या २६ चलनी नोटा), १५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे वाळे आणि पायातील बेले असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे, तर त्यांच्या समोरील सुखदेव शंकर दंडगव्हाळ यांच्या व बापू हरी पाठक यांच्या घरांच्याही दरवाजांचे कुलूप कटरच्या साहाय्याने कापून आतमधील वस्तूंची शोधाशोध केली आहे. मात्र, ते लोक प्रत्यक्ष हजर नसल्याने घरातील काही ऐवज लंपास झाले की नाही ते कळू शकले नाही. दहिवड व येथील चोरीचा तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर, पोलीस कर्मचारी अशोक फसाले, किरण पवार आदी करीत आहेत. (१८ देवळा १)वाखारी येथे पिंपळेश्वर ग्रामीण पतसंस्था, यशवंत शिरसाठ यांचे घर, पोस्ट ऑफिस व डॉ.संजय शिरसाठ यांचा दवाखाना अशा चार ठिकाणी कुलुपे तोडत चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, चोरट्यांच्या हाती जास्त काही न लागल्याने किरकोळ वस्तू व रक्कम चोरीस गेली आहे. विशेष म्हणजे तोडलेली सर्व कुलुपे चोरटे घेऊन गेले आहेत.
एकाच दिवशी सात घरफोड्यांनी घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 01:35 IST
देवळा : तालुक्यातील दहिवड व वाखारी येथे शनिवारी रात्री घरफोडीच्या एकाच दिवशी सात घटना घडल्याने, ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण आहे. बंद घरे फोडण्याचे धोरण चोरट्यांनी अवलंबले असल्याचे दिसून येते. यातील फक्त एकाच चोरीच्या घटनेची नोंद देवळा पोलिसांत झाली आहे.
एकाच दिवशी सात घरफोड्यांनी घबराट
ठळक मुद्देदहिवड, वाखारी परिसरात भीतीचे वातावरण