लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी असलेल्या शिवडी परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्य्े घबराट पसरली आहे. परिसरातील द्राक्षबागांत बिबट्याच्या पाऊलांचे ठसे आढळुन आले आहे. एका शेतकर्याचा पाळीव कुत्रादेखील बिबट्याने हल्ला करुन फस्त केला आहे.शिवडी शिवारात माळवाडी रोडलगत असलेल्या जेऊघाले वस्तीवर शेतकरी गोरख जेऊघाले यांना कुत्र्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने त्यांनी लागलीच दरवाजा उघडुन पाहिले असता बिबट्या कुत्र्याला ओढुन द्राक्षबागेतील अंधारात घेऊन जात होता. सकाळी कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडल्याचे निदशर्नास आले.या प्रकाराने शिवडी सोनेवाडी उगांव भागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. वन विभागाने शिवडी सोनेवाडी परिसरात पिंजरा लावावा व बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शिवडीत बिबटयाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 00:47 IST
लोकमत न्यूज नेटवर्क लासलगाव : निफाड तालुक्यातील द्राक्षपंढरी असलेल्या शिवडी परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्य्े घबराट पसरली आहे.
शिवडीत बिबटयाची दहशत
ठळक मुद्देकुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडल्याचे निदशर्नास आले.