शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पांडवलेण्यातील मोरांचे अस्तित्व धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:11 IST

मोकाट कुत्र्यांकडून शिकार, पक्षीप्रेमींची नाराजी

ठळक मुद्देमोकाट कुत्र्यांकडून शिकारपक्षीप्रेमींची नाराजी

संजय शहाणेनाशिक/इंदिरानगर : देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचे पांडवलेणी परिसरातील वास्तव्य धोक्यात आले असून, महापालिकेकडून शहराच्या विविध भागातून पकडण्यात येणारे मोकाट श्वान पांडवलेण्याच्या परिसरात सोडले जात असल्याने या श्वानांकडून विशेष करून मोरांची शिकार केली जात असल्याचे आढळून आले आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून दादासाहेब फाळके स्मारक उभारून परिसराचे सुशोभिकरण केले असताना त्याच परिसरात मोरांचे अस्तित्व धोक्यात आल्याने पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले फाळके व बुद्ध स्मारक बघण्यासाठी विविध राज्यांतून आणि शहरातून दररोज शेकडो संख्येने पर्यटक हजेरी लावतात त्यामुळे पर्यटकांची येथे रेलचेल असते. पांडवलेणी डोंगराच्या परिसरात दाट जंगल असल्याने शेकडो मोर येथे वास्तव्यास असून त्यांचे दर्शन अनेक पर्यटकांना झाले आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने सकाळच्या सुमारास स्मारकाच्या लॉन्सवर व पांडवलेण्याच्या पायऱ्यांवर पिसारा फुलवून नृत्य करणारे मोरांचे नयनमनोहर दृश्य दररोज व्यायामासाठी येणाºया नागरिकांना बघायला मिळत असले तरी, त्यात दिवसेंदिवस मोरांची संख्या कमी होत चालल्याचेही दिसू लागले आहे. यामागे भटक्या श्वानांचे कारण पुढे आले असून, शहरातील विविध भागातून पकडलेले मोकाट श्वान महापालिकेकडून पांडवलेणी व खतप्रकल्पाच्या परिसरात सोडण्यात येतात. हे मोकाट श्वान फाळके स्मारक आणि पांडवलेणी परिसरात येत असून, त्यांच्याकडून मोरांची शिकार केली जाते. गेल्या काही महिन्यांपासून पांडवलेण्याच्या परिसरात मृत्यू पावलेल्या मोरांचे अनेक ठिकाणी अवशेष सापडले आहेत. त्यामुळे मोरांचे अस्तित्व नष्ट होत असल्याबद्दल पक्षीपे्रमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकbirds sanctuaryपक्षी अभयारण्य