शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

पंढरपूर सायकलवारीतील सायकलिस्ट

By admin | Updated: July 15, 2016 00:54 IST

नाशकात परतलेविठू नामाचा गजर : तीन दिवसांत पूर्ण केले ३५० कि.मी.चे अंतर पार

 नाशिक : विठू नामाचा जयघोष करत मजलदरमजल करत नाशिकहून निघालेले सायकलिस्ट रविवारी (दि.१०) पंढरपूरला पोहोचले. नाशिक सायकलिस्टतर्फे काढण्यात आलेल्या या सायकलवारीत ४०० हून अधिक सायकलिस्ट सहभागी झाले होते. नाशिकसह पुणे, मुंबई, औरंगाबाद आदि ठिकाणांहून सायकलिस्ट या सायकलवारीत सहभागी झाले होते.या सायकलवारीला मोठ्या उत्साहात नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून सुरुवात करण्यात आली. पंढरपूरकडे मार्गक्रमण करताना मुखी विठूचे नाम तसेच वाटेतून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या आणि ये-जा करणारी वाहने यातून मार्ग काढत हे सायकलिस्ट रविवारी पंढरपूरमध्ये दाखल झाले. नाशिकहून निघालेल्या या सायकलवारीत सिन्नर आणि संगमनेर येथूनही सायकलिस्टने सहभाग नोंदवला. आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या नाशिकसायकलिस्टने राबविलेल्या उपक्रमाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या सायकलवारीत वीस महिलांसह १५ लहान मुले आणि मुलींचादेखील सहभाग दिसून येत होता. नाशिक शहरात सायकल चालवण्याकडे कल वाढत आहे. ही सायकलवारी यशस्वी करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी, हरिष बैजल, हितेंद्र महाजन यांच्यासह प्रसाद गर्भे, वैभव शेटे, संदीप जाधव, दत्तू आंधळे, मिलिंद धोपावकर, किशोर काळे यांच्यासह नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)