शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
4
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
5
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
6
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
7
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
8
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
9
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
10
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
11
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
12
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
13
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
14
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
15
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
16
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
17
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
18
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
19
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?

जैवविविधतेची पंढरी अंजनेरीला हवे संरक्षण

By अझहर शेख | Updated: May 22, 2021 01:24 IST

निसर्गातील जे घटक नामशेष होत चाललेत, अशा वनस्पती असोत किंवा वन्यजीव, त्यांचे अंजनेरी राखीव वनाच्या कुशीत संवर्धन होताना दिसून येते. लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे माहेरघर म्हणून ‘’अंजनेरी’’चा नावलौकिक तर आहेच, मात्र दुर्मिळ ‘’सेरोपेजिया अंजनेरिका’’ (कंदिलपुष्प)सारख्या असंख्य वनस्पती या राखीव वनक्षेत्रात आढळतात. समृद्ध जैवविविधतेचा हा नैसर्गिक वारसा अखंडितपणे संरक्षित ठेवणे काळाची गरज बनली आहे.

ठळक मुद्देगिधाडांचे प्रजनन स्थळ : कंदीलपुष्पासारख्या ३८५  वनस्पतींचे माहेरघर

नाशिक : निसर्गातील जे घटक नामशेष होत चाललेत, अशा वनस्पती असोत किंवा वन्यजीव, त्यांचे अंजनेरी राखीव वनाच्या कुशीत संवर्धन होताना दिसून येते. लांब चोचीचे व पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचे माहेरघर म्हणून ‘’अंजनेरी’’चा नावलौकिक तर आहेच, मात्र दुर्मिळ ‘’सेरोपेजिया अंजनेरिका’’ (कंदिलपुष्प)सारख्या असंख्य वनस्पती या राखीव वनक्षेत्रात आढळतात. समृद्ध जैवविविधतेचा हा नैसर्गिक वारसा अखंडितपणे संरक्षित ठेवणे काळाची गरज बनली आहे.शहरापासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर  असलेल्या अंजनेरीचे नैसर्गिक आणि पर्यावरणीयदृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. या राखीव वनाच्या परिसरात अलीकडच्या काळात मानवी हस्तक्षेप वाढताना दिसून येतोय. आजुबाजूला विविध प्रकल्प उभे राहत आहेत. मानवाचे अतिक्रमण हळूहळू या वनाच्या दिशेने होऊ लागले असून यास वेळीच रोखण्याची गरज आहे. शासनाने या वनक्षेत्राला राखीव वनाचा दर्जा दिला आहे. तसेच वन विभागाने औषधी वनस्पती संवर्धन क्षेत्र म्हणून या भागाला घोषित केले आहे. अंजनेरी राखीव वनात असलेली कारवीची वाढ ही दर्जेदार झाली असून कारवीची फुले यावर्षी फुलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.अशी आहे वन्यजीवसंपदा... अंजनेरी वनात बिबटे, कोल्हे, मोर, तरस, खोकड, माकड, रानडुक्कर, साळींदर, मुंगुस, रानमांजर, उदमांजर, रानससे, लांडगा, भेकर, घोरपड, लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा अधिवास आढळून येतो. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर, हरणटोळ, घोणस, कोब्रा (नाग), मण्यार आदी सर्प आढळतात. याबरोबरच विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी हे वन नंदनवन आहे.२००६ साली ‘’कंदीलपु�प’’चा शोधअंजनेरीच्या पठारावर तेराशे मीटर उंचीवर मुरमाड जागेमध्ये सेरोपेजिया या वनस्पतीची नोंद शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. आर. यादव व डॉ. नीलेश मालपुरे यांनी २००६ मध्ये केली. ती सर्वात प्रथम अंजनेरीवर सापडली, म्हणून तिला ‘’सेरोपेजिया अंजनेरिका ‘’(कंदीलपु�प) असे नाव दिले गेले.  ‘वाघाटी’ केवळ अंजनेरी वनात२०२० साली नाशिकमधील अभ्यासक डॉ. संजय औटी, शरद कांबळे, कुमार विनोद, अरुण चांदोरे यांनी अंजनेरीचा भौगोलिक अभ्यास करून तेथील जैवविविधतेवर प्रकाश टाकणारा शोधनिबंध तयार केला आहे. त्यांना दुर्मिळ ‘’वाघाटी’’ ही वनस्पती आढळून आली आहे. ही वनस्पती अन्यत्र कोठेही नसल्याचा दावा औटी यांनी केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकBio Diversity dayजैव विविधता दिवस