शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:28 IST

पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांना झोडपून काढणाºया परतीच्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून, शासनस्तरावरून यासंदर्भात थेट आदेश प्राप्त झाले नसले तरी, ज्या ज्याठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गुरुवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व मुल्हेर येथे अनुक्रमे ७७ व ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागांना झोडपून काढणाºया परतीच्या वादळी पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून, शासनस्तरावरून यासंदर्भात थेट आदेश प्राप्त झाले नसले तरी, ज्या ज्याठिकाणी अतिवृष्टी झाली अशा भागातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गुरुवारी बागलाण तालुक्यातील ताहाराबाद व मुल्हेर येथे अनुक्रमे ७७ व ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.परतीच्या पावसाने सलग पाच दिवस धुमाकूळ घातल्यामुळे शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले असून, द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत, तर सोयाबीन व तूर नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. कापणीला आलेला व कापणी करून ठेवलेल्या मक्याला पुन्हा तुरे फुटू लागले तर बाजरीच्या बाबतीतही तोच प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याचे पीक पावसामुळे जमीनदोस्त होण्याची भीती आहे, भाजीपाल्याचीही हीच परिस्थिती असून, शेतकºयांना पाऊस नकोसा झालेला असताना गुरुवारी जिल्ह्यात २२५ मिलीमीटर, तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील नाशिक, निफाड, नादंगाव, मालेगाव या चार तालुक्यांत ४२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत असले तरी, शासनाने अद्याप त्याबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. परंतु अतिवृष्टी झाल्यास पीक पंचनामा करण्याची तरतूद असल्यामुळे प्रशासनाने तलाठ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत. अतिवृष्टी न झालेल्या भागातही शेती पिकांचे नुकसान होत असल्याने याठिकाणीही पाहणी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.