शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वट असूनही शिक्षणात माठ असणाऱ्यांची पंचाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:39 IST

लासलगाव : नुकत्याच एका शासन निर्णयाने अंगठेबाज सरपंच व त्यातही महिला सरपंचपदावर आरक्षणाने विराजमान झालेल्या सरपंचपदामुळे अनेक घोटाळे उघडकीस आले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आता सरपंच व्हायचे असेल तर सातवी पास ही शैक्षणिक अर्हता अनिवार्य करण्यात आल्याने अनेकांना इच्छा असूनही निवडणुका लढविता येणार नाही. त्यामुळे त्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.

ठळक मुद्दे सरपंचपदासाठी खोडा : सातवी उत्तीर्ण अर्हता केली अनिवार्य

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शासनाने नवा जीआर जारी केल्याने ग्रामपंचायत सदस्य होण्याच्या अनेकांच्या इच्छांवर पाणी फेरले आहे. जो उमेदवार १९९५ नंतर जन्मलेला असेल आणि ज्याला सरपंच म्हणून नियुक्त करायचे असेल तर संबंधित उमेदवार सातवी पास असणे आवश्यक आहे. २४ डिसेंबरला हा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गावात वट असूनही केवळ शिक्षण नसल्याने अनेकांना निवडणूक लढवता येणार नाही. परिणामी आपल्या सग्यासोयऱ्यांना, शिकलेल्या बायकोला उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी सेटिंग सुरू केली आहे.सलग सुट्ट्यांमुळे टेन्शननिवडणूक आयोगाने इच्छुकांना २३ ते ३० डिसेंबरदरम्यान अर्ज भरण्यास सांगितले आहे. मात्र, यातील तीन दिवस तर सुट्ट्यांमध्येच जात असल्याने कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे आता इच्छुकांची थेट सोमवारीच अर्ज भरण्यासाठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करणे, झेरॉक्स करणे, अनामत रकमेची जमावजमव करणे आदी गोष्टींसाठी या इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ऑनलाइन अर्ज भरतानादेखील अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत. तांत्रिक कारणामुळे उमेदवारी अर्ज भरताना वेळ लागत आहे.सेतू केंद्रांवर गर्दीदरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील सेतू केंद्रावर प्रचंड गर्दी झाली आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकाच वेळी सेतू केंद्रावर आल्याने ही गर्दी झाली असून त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात हे चित्र पाहायला मिळत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत