या बैठकीस शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धन, बाळासाहेब कर्डक, धनंजय निकाळे, कविता कर्डक, संतोष जगताप, सरिता पगारे, सुरेखा निमसे, सचिन कळासरे, किरण पानकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी तळागाळातील जण सामान्य नागरिकांपर्यंत पक्षाचे काम पोहचवावे तसेच पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कामाबाबत नागरिकांना माहिती देणे, पक्ष ठरवेल त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे आदी विषयावर चर्चा करण्यात येऊन इच्छुकांच्या मुलाखत घेण्यात आल्या. यावेळी विजय पेलमहाले, सरिता पगारे, प्रकाश खराटे, संतोष जगताप, रामभाऊ जाधव, संतोष जेजुरकर, रवींद्र जाधव, मीनाक्षी काकळीज, संदीप महाले, मोतीराम पिंगळे, अरुण थोरात उपस्थित होते.
पंचवटीत राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST