शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

हळव्या कोपऱ्यातून पाझरला आठवणींचा झरा

By admin | Updated: May 30, 2016 22:24 IST

स्नेहमेळावा : एचपीटीच्या माजी विद्यार्थ्यांचे हितगुज

नाशिक : मित्र म्हणजे प्रत्येकाच्या हृदयातील हळवा कोपरा. मैत्रीचे हे बंध रक्ताच्या नात्याहूनही अधिक सरस आणि श्रेष्ठ ठरत आलेले आहेत. २५ वर्षांपूर्वी गोखले शिक्षण संस्थेच्या एचपीटी महाविद्यालयात पदवी-पदव्युत्तर शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी अर्थात मित्र-मैत्रिणींचा गोतावळा गेल्या रविवारी (दि.२९) एकत्र आला आणि प्रत्येकाच्या हळव्या कोपऱ्यातील आठवणींचा झरा पाझरता झाला. १९८८ ते १९९५ या कालावधीत गोखले शिक्षण संस्थेच्या एचपीटी महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम एकत्र आणले ते व्हॉट्स अ‍ॅपने. एचपीटी कॉलेज ग्रुप तयार झाल्यानंतर त्यामध्ये एकेका मित्र-मैत्रिणींची भर पडत गेली आणि तेथूनच एकत्र जमण्याची ओढही लागली. आपापल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त असलेल्या प्रत्येकाच्या सोयीनुसार एकदाची तारीख निश्चित झाली आणि हॉटेल व्यवसायात नाव कमावलेल्या प्रसन्ना बोंडे या मित्राच्याच त्र्यंबकरोडवरील आनंद रिसॉर्टवर सर्वांसाठी रविवारचा दिवस सुखद आणि आनंददायी ठरला. एचपीटीच्या माजी विद्यार्थ्यांनी मग प्राचार्य, प्राध्यापकांपासून ते आपल्या शेजारी बाकावर बसणाऱ्या मित्रापर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला. या स्मरणरंजनात सारे गुंतून गेले आणि मैत्रीच्या नात्याचे बंध अधिकाधिक घट्ट होत गेले. आपले मित्र कुणी नगरसेवक झालेले, कुणी थेट पोलीस खात्यात अधीक्षकांपर्यंत झेप घेतलेली, तर कुणी थेट न्यायाधीशाच्या खुर्चीत बसलेले पाहून आनंदाला पारावर राहिला नाही. महाविद्यालयीन निवडणुकांमधील गमतीजमतीपासून ते अगदी प्रेम प्रकरणांवरही गप्पा रंगल्या. मैत्रीचे हे बंध असेच आणखी घट्ट करण्याच्या आणाभाका घेत प्रत्येकजण मार्गस्थ झाला. यावेळी एचपीटीचे माजी विद्यार्थी प्रसन्ना बोंडे, चंद्रकांत खोडे, कुणाल वाघ, भारत कोकाटे, विश्वजित जाधव, आशिष चौधरी, रवि सूर्यवंशी, संतोष कासार, हेमंत वैद्य, भोलानाथ वाघचौरे, संगीता फुके, महेंद्र भालेराव, संजय काळे, रवि काळे, अनिल गावंडे, अनिल देशमुख, बिपीन सोनवणे, मदन दोंदे, धनंजय वाखारे, स्वर्णिता महाले आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)