शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड डावा कालवा पाण्याच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:07 IST

पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच विहिरी उपसायला लागल्या आहेत. रब्बीतील उन्हाळ कांदा, लाल कांदा, गहु, हरभरा या पिकांना पाणी भरण्यासाठी अडचण भासत आहे.

ठळक मुद्देयेवला : विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांना कांदे वाचवण्याची चिंता

पिंपळगाव लेप : येथील परिसरातील बऱ्याच विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या परिसरात दरवर्षी कितीही पाऊस झाला. तरी जानेवारी महिन्यात विहिरींना पाणी टंचाई निर्माण होते. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच विहिरी उपसायला लागल्या आहेत. रब्बीतील उन्हाळ कांदा, लाल कांदा, गहु, हरभरा या पिकांना पाणी भरण्यासाठी अडचण भासत आहे.           अजून ब-याच शेतकऱ्यांचे पोळ कांद्यासाठी दोन पाणी भरण्याची आवश्यकता आहे. परंतु विहिरींचे फक्त दिवसभरातुन दोन तासच पाणी पुरवत असुन शेतकऱ्यांनी गहू, हरभरा,कांदा आदी पिके शेतात असल्याने पिकांना होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन या परिसरातील ब-याच शेतकऱ्यांनी रोपे विकून टाकली आहेत.या भागात रांगडा व उन्हाळ कांदा लागवडीला जास्त पसंती असते.म्हणून तुरळक शेतकऱ्यांची शेततळी असल्याने पिकांना पाण्यासाठी आश्रय घेतांना दिसत आहे. अशेच शेतकरी कांदा लागवड करतांना दिसत आहेत.अजून काही दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आतापासुनच पिकांना काटकसरीने पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.आवकाळी पाऊसाने शेतातील रोपे खराब झाली होती. म्हणून शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केली होती, मात्र आता विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पेरलेला कांदा रोपे विक्री करतांनाही शेतकरी दिसुन येतात. म्हणून या परिसरातील जमीनीचे क्षेत्र हे पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर अवलंबून असल्याने शेतकरी पाणी केव्हा येणार या प्रतिक्षेत असुन लवकरात लवकर पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनाकडुन होत आहे.प्रतिक्रिया -यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने मी विहिरीच्या भरवशावर कांदा लागवड केली होती. मात्र अचानक विहिरींने तळ गाठल्याने ते कांदे दोन दिवस ऊन्हात पडलेले होते.तसेच परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याने पालखेड डाव्या कालव्याच्या प्रतिक्षेत आहे- भाऊसाहेब रसाळ, शेतकरी, पिंपळगाव लेप. 

टॅग्स :water shortageपाणीकपातtalukaतालुका