शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खालपफाटा शाळेत ‘पाहुणा आला फळा’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST

लोहोणेर : - कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध शिक्षक वेगवेगळे ...

लोहोणेर : - कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध शिक्षक वेगवेगळे प्रयोग राबवीत आहेत. लोहोणेर शिवारातील खालपफाटा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेस उपक्रमशील शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांच्या ‘पाहुणा आला फळा’ या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

सूर्यवंशी यांच्या एज्युकेशन ऑन व्हीलस या उपक्रमाचेही याप्रसंगी उद्घाटन करण्यात आले. शिक्षक ऑनलाइन शिक्षणासाठी निरनिराळे प्रयोग राबवीत असताना गरीब, आदिवासी, मजूर पालकांच्या मुलांना ऑनलाइन शिक्षणाची कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. अशा मुलांचा शिक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सूर्यवंशी यांनी वस्तीवरील फळे रंगवून प्रत्यक्ष तेथे जाऊन अध्यापनाचे काम गेले वर्षभर सुरू ठेवले. यावर्षीदेखील कोरोनाच्या साथीमुळे शाळा उघडल्या नाहीत. अशा वेळेस मुलांच्या शिक्षणातील उणीव भरून काढण्यासाठी सूर्यवंशी यांनी ‘एज्युकेशन ऑन व्हीलस’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात शाळेत उपलब्ध असलेले शैक्षणिक वातावरण प्रत्यक्ष वस्तीवर उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवदास वाघ, मुख्याध्यापिका पुष्पा गुंजाळ, माजी सरपंच हिरामण वाघ आदी उपस्थित होते.

---------------------------

परिणामकारक अध्यापन

मोबाइल स्पीकर, हँडपपेटस्‌ तसेच इतर शैक्षणिक साहित्याचा वापर करून मुलांचे अध्यापन अधिक परिणामकारक करीत शाळेतील वातावरण प्रत्यक्ष मुलांच्या अंगणात निर्माण होत आहे. चांगल्या आरोग्याच्या सवयी, कृतीयुक्त खेळ, स्पीकरचा वापर करून कविता व गाणे घेणे, इंग्रजी संभाषणासाठी हँडपपेट्सचा वापर करणे. अशा अनेक प्रयत्नांची प्रत्यक्ष गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, तसेच विस्ताराधिकारी किरण वसावे यांनी भेट देऊन पाहणी केली व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमात मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी नेलकटरचे वाटप करण्यात आले.

----------------------

लोहोणेर खालप फाटा येथील शाळेत ‘पाहुणा आला फळा’ उपक्रमाचे कौतुक करताना सतीश बच्छाव, किरण वसावे, शिवदास वाघ व वैशाली सूर्यवंशी. (०३ लाेहोणेर १)

030721\03nsk_3_03072021_13.jpg

०३ लोहोणेर १