शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दर नसल्याने डांगरे फेकली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 15:31 IST

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी गिरीश धारस्कर यांनी आपल्या २० गुंठे शेतात केलेल्या डांगरे कवडीमोल दराअभावी फेकून दिली. यातून उत्पादन खर्च फिटने देखील दुरापास्त झाल्याने हतबल झालेल्या धारस्कर यांनी आपल्या ३० ते ४० क्विंटल माल फेकून दिला.

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी गिरीश धारस्कर यांनी आपल्या २० गुंठे शेतात केलेल्या डांगरे कवडीमोल दराअभावी फेकून दिली. यातून उत्पादन खर्च फिटने देखील दुरापास्त झाल्याने हतबल झालेल्या धारस्कर यांनी आपल्या ३० ते ४० क्विंटल माल फेकून दिला.गिरीश धारस्कर यांनी फेब्रुवारी महिन्यात २० गुंठे शेतात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करत मोठ्या कष्टाने डांगरांची लागवड केली होती. डांगरांतुन यंदा चांगले उत्पादन मिळेल अशी आशा धारस्कर यांना होती. लागवड दर्जेदार होत असल्याचे बघून त्यांनी २० गुंठ्याच्या लागवडीसाठी सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत खर्च केला होता.मार्च महिन्यात डांगराचे उत्पादन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या डांगराना ३५ ते ४० रुपये प्रति किलोचाभाव मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अचानक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन होताच ३५ रुपये प्रति किलो दराने विकले जाणारे डांगर केवळ ४ ते ५ रुपये प्रति किलो दराने विकले जाऊ लागले. एप्रिल आणि मे महिन्यात आठवडे बाजार बंद असल्याने भाजीपाला विकता येत नव्हता. धारस्कर यांनी सुमारे अडीच ते तीन महिने डांगरे साठवणूक करून सुरक्षित ठिकाणी ठेवले होते.मात्र दोन महिन्यांचा लॉकडाऊन नंतर जून महिन्यात देखील कवडीमोल भावमिळत असताना साठवून ठेवलेले डांगर खराब होऊ लागल्याने धारस्कर यांनी केलेल्या भाव वाढीच्या अपेक्षांच केवळ स्वप्न राहिले. अखेर हतबल होऊन खराब झालेले ५० क्विंटल पैकी सुमारे ३० ते ४० क्विंटल डांगर उक्कीरड्यावर टाकून देण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया गिरीश धारस्कर यांनी व्यक्त केली आहे.-------------------------मोठ्या अपेक्षेने मी डांगर लावले होते. डांगर चांगले यावे यासाठी ४० हजार रुपयांपर्यंत खर्च केला मात्र अचानक लॉकडाऊन झाल्याने डांगराला कवडीमोल भाव मिळाल्याने यातून साधा उत्पादन खर्च देखिल फिटला नाही. ---- गिरीश धारस्कर, शेतकरी , पिंपळगाव लेप.

टॅग्स :Nashikनाशिक