शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

वडनेरभैरवच्या सरपंचपदी पाचोरकर ; उपसरपंचपदी योगेश साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 17:51 IST

वडनेरभैरव : जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या वडनेरभैरवच्या सरपंचपदी सुनील दत्तात्रेय पाचोरकर यांची तर उपसरपंचपदी योगेश अशोकराव साळुंखे हे अटीतटीच्या लढतीत निवडून आले.

ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार उत्तम भालेराव यांच्या गटाला आठ जागा, तर कादवाचे माजी संचालक संजय पाचोरकर, भाजपचे नेते बाळासाहेब माळी, माजी उपसरपंच बाबाजी सलादे, पोपटराव पाचोरकर यांच्या गटाला पाच तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव वक्ते यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या होत्या. प्रतिभा खेडकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. खिराडकर या भालेराव गटात सामील झाल्या तर भालेराव गटातीलच स्व.अशोक शिंदे पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील पाचोरकर यांनी सोडचिठ्ठी देत विरोधी गटांत सामील होत सरपंचपदावर विराजमान झाले. जास्त जागा निवडून आणूनही सरपंचपदाच्या निवडीत उत्तम भालेराव यांचे पुतणे रावसाहेब भालेराव यांना एका मताने पराभव पत्करावा लागला. निवडणूकीनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने सरपंचपदासाठी चुरस निर्माण झाली होती. दि. २५ रोजी झालेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी सुनील पाचोरकर व रावसाहेब भालेराव यांनी अर्ज दाखल केला होता. यात पाचोरकर यांना नऊ, तर भालेराव यांना आठ मते मिळाली, तर उपसरपंचपदासाठी साळुंखे यांना नऊ व प्रतिभा खिराडकर यांना आठ मते मिळाली. १७ सदस्यांनी निवडप्रक्रियेत सहभाग घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी द्यानेश्वर सपकाळे यांनी सरपंचपदी पाचोरकर, तर उपसरपंचपदी साळुंखे निवडून आल्याचे घोषित केले.यावेळी सदस्य सुरेश वक्ते, मंगल देवरे, अरुण पवार, संजय पवार, विजय शिरसाठ, माधुरी जाधव, सुनील पाचोरकर, मंजूबाई निमकर, भागूबाई बिन्नर, अश्विनी डंबाळे, संगीता सगर, रत्ना माळी, सुनीता भालेराव, अमोल माळी यांच्यासह संपतराव वक्ते, पोपटराव पाचोरकर, बाळासाहेब माळी, बाबाजी सलादे, माजी चेअरमन राजाराम तिडके, संजय पाचोरकर, नाना सलादे, शशी वक्ते, अमित माळी, दीपक पाचोरकर, डॉ. सुनील आहेर, डॉ.प्रदीप परदेशी, माधवराव शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत