शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पसारा बोगनवेलीचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:30 IST

‘हरित नाशिक-स्वच्छ नाशिक’ हे ब्रीद मिरविणाºया महापालिका प्रशासनाने शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांपासून तर पदपथांपर्यंत सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळते. कुठे प्रमाणापेक्षा अधिक वाढलेल्या बोगनवेलीचा पसारा तर कुठे कापलेल्या बोगनवेलीचा पदपथांवर टाकलेला कचरा असे चित्र पहावयास मिळत आहे.

नाशिक : ‘हरित नाशिक-स्वच्छ नाशिक’ हे ब्रीद मिरविणाºया महापालिका प्रशासनाने शहरातील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांपासून तर पदपथांपर्यंत सर्वच बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळते. कुठे प्रमाणापेक्षा अधिक वाढलेल्या बोगनवेलीचा पसारा तर कुठे कापलेल्या बोगनवेलीचा पदपथांवर टाकलेला कचरा असे चित्र पहावयास मिळत आहे.  शहरातील पर्यटकांची वर्दळ असलेल्या पंचवटी-तपोवन परिसराला जोडणाºया मुख्य शाही मार्गाची महापालिकेच्या दुर्लक्षामुळे दुरवस्था झाली असून, या रस्त्याला ‘शाही’ बकालपणा आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आमदारांच्या मतदारसंघातील हा शाही मार्ग ‘शाही स्वच्छता’ अभियानाच्या प्रतीक्षेत आहे. गौरी पटांगण ते पंचवटी अमरधामपर्यंत शाही मार्गावरील दुभाजकांमध्ये अस्ताव्यस्त वाढलेल्या बोगनवेलीचा पसारा बघून पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.  रस्त्याच्या दुतर्फा पदपथांवर असलेली अस्वच्छता, डेब्रीज व घाणीच्या साम्राज्यामुळे या मार्गावरून मार्गस्थ होताना पर्यटकांना नाकातोंडाला रुमाल लावावा लागतो. गोदाकाठालगतच्या या शाही मार्गासाठी विकासाचे ‘शाही मॉडेल’ राबविण्याची गरज आहे.  या मार्गावर स्वच्छता करून मार्गाचे नूतनीकरण करत धार्मिक पर्यटनस्थळांची माहिती दर्शविणारे फलक उभारण्याची गरज आहे. तसेच दुभाजकांची आकर्षक बांधणी करून रंगरंगोटी केल्यास पर्यटकांमध्ये चांगला संदेश जाण्यास मदत होईल. फांद्या छाटाव्यात मुंबई नाक्यावरील महामार्गापासून चांडक सर्कलकडे जाणाºया अहल्यादेवी होळकर मार्गावरील दुभाजकांमधील बोगनवेलीचा वाढलेला पसारा कमी करण्यासाठी छाटणी करण्यात आली; मात्र नंतर वेलीच्या फांद्या रस्त्याच्या पदपथावर टाकण्यात आल्याने त्यांचा पसारा कायम असून, त्यामुळे रस्त्याच्या विद्रूपीकरणात भर पडली आहे. रस्त्यावरील फांद्या उचलून स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.