शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:26 IST

अवघ्या वीस दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, बाजारामध्ये छोट्या-मोठ्या गणरायाच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर कारखान्यांमध्ये गणपतीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवून मूर्ती तयार करीत आहे.

नाशिकरोड : अवघ्या वीस दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, बाजारामध्ये छोट्या-मोठ्या गणरायाच्या मूर्ती विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. तर कारखान्यांमध्ये गणपतीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवून मूर्ती तयार करीत आहे.  अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या गणरायाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असून, सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. बाजारामध्ये खासगी गाळ्यांमध्ये घरगुती गणपती विक्रीसाठी दाखल होऊ लागले आहेत. मनपाकडून गणपती मूर्ती विक्रीच्या स्टॉलसाठी अद्याप जागा निश्चित झालेली नाही. राज्य शासनाने प्लॅस्टिक, थर्माकोल यावर बंदी टाकल्याने अद्याप बाजारात आराससाठी वापरण्यात येणारे थर्माकोलचे मंदिर उपलब्ध झालेले नाही. यामुळे विक्रेते व भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.  गणेशमूर्ती बनविण्याच्या कारखान्यांमध्ये छोट्या घरगुती मूर्ती जवळपास पूर्ण झाल्या असून, त्या विक्रेत्यांकडे पाठविण्यास सुरुवात झाली आहे. काही प्रमाणात राहिलेल्या छोट्या आकाराच्या गणपती मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवून पूर्ण केल्यानंतर त्या मूर्ती राखी पौर्णिमेनंतर पुढील आठवड्यात बाजारात विक्रीसाठी दाखल होतील. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींचेदेखील निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून, लहान मूर्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम पूर्ण करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून एकसारखी पावसाची रिपरिप सुरू असून, वातावरणात गारवा निर्माण झाल्याने रंग वाळण्यास वेळ लागत आहे. कच्च्या मालाला जीएसटीराज्य शासनाने श्री गणरायाच्या मूर्ती व राख्या यांना जीएसटीमधून वगळले आहे. मात्र गणपती बनविण्यासाठी प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंग आदी कच्च्या मालाला जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे कच्च्या मालाची किंमत वाढली असून कारागीरांची मजुरीदेखील वाढली आहे. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीच्या किमतीतदेखील काही प्रमाणात वाढ झाली आहे.

टॅग्स :Ganpati Utsavगणपती उत्सवganpatiगणपती