शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:37 IST

प्रभाग ३१ मध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांनी थेट पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला.

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : सध्या पावसाळ्याचे दिवस असून, धरणातही मुबलक पाणीसाठी असताना प्रभाग ३१ मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांना अत्यंत कमी दाबाने व अपुऱ्या स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने आज प्रभागाचे नगरसेवक व महिलांनी थेट पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडत पाणीप्रश्न मार्गी लावावा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. सिडको प्रभागात समाविष्ट असलेल्या प्रभाग ३१ मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने व अपुऱ्या स्वरूपात पाणीपुरवठा होत असल्याने याबाबत महिलांनी प्रभागाचे नगरसेवक पुष्पा आव्हाड व साहेबराव आव्हाड यांची भेट घेऊन पाणीप्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नगरसेवक आव्हाड यांनी महिलांना बरोबर घेत मनपा सिडको विभागीय कार्यालयाकडे मोर्चा वळविला व पाणीपुरवठा अधिकारी संजय बच्छाव यांच्या दालनात जाऊन याबाबत त्यांना जाब विचारला. नगरसेवक आव्हाड यांनी अधिकाऱ्यांना प्रभागातील सदिच्छानगर, वासननगर, रविकिरण सोसायटी, रामनगर, श्रीजी पॅलेस यांसह प्रभाग ३१ मध्ये बहुतांशी ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, पाऊस चांगला झाल्याने धरणातही मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिलावर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. या भागातील काही नागरिकांना सकाळी तर काहींना दुपारी पाणीपुरवठा केला जात असला तरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समन्वय होत नसल्याने व कामचुकारपणामुळे पाणीसाठा मुबलक असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यावेळी प्रभागातील नागरिक वंदना काळे, जयश्री गावडे, योगीता गावडे, उषा ठाकरे, नंदा गायकवाड, मीना शिंदे, सुनीता पवार, अरुणा अवतारे, प्रतिभा पाटील, पुष्पा भोये, रेणुका गाडे, मेघा भोये, कलावती तौर, सुगंधा भोये आदींसह प्रभागातील महिला उपस्थित होत्या.