शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

ओझरचे टर्मिनल झाले शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:09 IST

येथून जवळच असलेल्या शिर्डी विमानतळाचे एक आॅक्टोबरला लोकार्पण झाल्यानंतर येथे विमानसेवेला केव्हा प्रारंभ होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. विमानसेवेसाठी तयार करण्यात आलेले येथील टर्मिनल शोभेची वास्तू झाल्याची चर्चा आहे.

ओझर : येथून जवळच असलेल्या शिर्डी विमानतळाचे एक आॅक्टोबरला लोकार्पण झाल्यानंतर येथे विमानसेवेला केव्हा प्रारंभ होईल, असा प्रश्न विचारला जात आहे. विमानसेवेसाठी तयार करण्यात आलेले येथील टर्मिनल शोभेची वास्तू झाल्याची चर्चा आहे.नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे एचएएल हा मिग विमानांचा कारखाना आहे. त्याला लागून एअरफोर्स स्टेशनदेखील आहे. या प्रकल्पांचा तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी जेव्हा पाया रचला तेव्हाच येथे मिग विमानाच्या चाचण्यांसाठी धावपट्टी बनविण्यात आली. ही भारतातील काही निवडक मोठ्या धावपट्ट्यांमध्ये एक आहे. याला ओझर विमानतळ असे नाव पडले. एकीकडे कारखाना उदयास आल्यानंतर लढाऊ विमानांना लागणाºया वस्तू या थेट ओझर विमानतळावर परदेशातून येण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे धार्मिक राजधानी असलेल्या नाशिकला औद्योगिक वारसा लाभायला लागला. परिणामी मोठे कारखाने नाशिकला स्थायिक झाले आणि एकूणच द्राक्ष पंढरी म्हणूनही ओळख असलेल्या नाशिकला विमानसेवेचे वेध लागले. एरवी दिल्ली मुंबईहून येणाºया राजकीय नेत्यांना ओझर विमानतळशिवाय दुसरा पर्याय आजही नाही. परंतु जिल्ह्यातील सामान्य माणूस जो आज पुणे, मुंबई, नागपूरची उड्डाण्े पाहतोय. असे असताना दीर्घकाळ बंद असलेली सेवा दहा पंधरा वर्षांपूर्वी एअर डेक्कन कंपनीने ओझर-मुंबई विमानसेवा दिली. परंतु काही दिवसांत ती बंद पडली. पुढे अनेक वर्षे नगरीत सेवा बंदच होती. दरम्यानच्या काळात एचएएल आणि कोनकोर यांनी कार्गो सेवा सुरू केली. पुन्हा नागरी विमानसेवेचा उठाव सुरू झाला आणि किंगफिशरने पुन्हा सुरू केली होती. यामुळे अनेक स्थानिकांना रोजगारदेखील मिळाला होता. अनेक महिने चालल्यानंतर वेळ, दर, कनेक्टिव्हिटी व एकूण प्रवासी संख्या लक्षात घेता त्यांनीदेखील काढता पाय घेतला. यानंतर नाशिकच्या लोकांना मुंबई, पुणेशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एचएएलशी समेट घडून आल्यानंतर जानोरी येथे टर्मिनलचे काम सुरू झाले. जिल्ह्यातील उद्योग, शेती, शैक्षणिक, सामाजिक संघटनांनी याचे स्वागत केले होते, परंतु लागलीच निवडणुका लागल्या व ओझरजवळील जानोरी येथील नाशिक विमानतळ शोभेची वास्तू झाली. आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिकला देशाला जलद जोडण्याची गरज असताना अजून तरी त्याला रेड सिग्नल आहे हे स्पष्ट आहे, तर त्याला सुरू असलेल्या देखभालीचा विचार न केलेला बरा.