ओझरकरांचा कडक निर्बंधाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 10:22 PM2021-05-13T22:22:53+5:302021-05-14T00:59:32+5:30

ओझर : नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे १२ मे दुपारी १२ वाजेपासून लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करत ओझरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व दुकाने पूर्णपणे बंद केल्याचे चित्र होते.

Ozarkar responds to strict restrictions | ओझरकरांचा कडक निर्बंधाला प्रतिसाद

ओझरकरांचा कडक निर्बंधाला प्रतिसाद

googlenewsNext
ठळक मुद्देअनावश्यक फिरणाऱ्यांची तपासणी करुन कोविड सेंटरला रवानगी

ओझर : नाशिक जिल्ह्यात वाढलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे १२ मे दुपारी १२ वाजेपासून लागू केलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करत ओझरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व दुकाने पूर्णपणे बंद केल्याचे चित्र होते.

अनावश्यकपणे फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून चांगलीच तंबी देण्यात आली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ब्रेक द चेन मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
प्रशासनाने पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत ज्या व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत आहेत अशा नागरिकांची ओझर प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजेन टेस्ट करून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली होती.

त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजेनंतर शहरातील मेडिकल, हॉस्पिटल सेवा सोडल्या तर इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलत सायंकाळी चार वाजेपासूनच मुख्य रहदारीसाठी सुरु ठेवण्यात आलेल्या गडाख कॉर्नर येथे नाकाबंदी लावण्यात आलेली असताना प्रत्येक वाहन चालकाची विचारपूस करण्यासाठी पोलीस सरसावले व अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना आर्थिक दंड करण्यात आला.

Web Title: Ozarkar responds to strict restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.