शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

ओझरला विचित्र अपघात; धुळ्यातील तीन ठार

By admin | Updated: June 9, 2014 00:50 IST

दुर्घटना : मृत एकाच परिवारातील; नऊ गंभीर

 

ओझर टाऊनशिप : दुचाकी चालविणाऱ्या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या दुर्घटनेत धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील एकाच परिवारातील तीन जण जागीच ठार, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. ओझरनजीकच्या चौफुलीवर सदर दुर्घटना घडली. जखमींमध्ये सटाण्यातील नायब तहसीलदारांसह मुंबईतील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील देवपूर येथील डॉ. विनोद मदन वसावे (५०) हे आपली पत्नी डॉ. मीनाक्षी (४५) व मुलगा गौरव यांच्यासह कारने (एमएच १२ एएन-१३८०) नाशिककडे जात होते. ओझरनजीकच्या चौफुलीवर रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात नाशिककडून ओझरकडे भरधाव वेगात येणारी निवृत्त न्यायमूर्ती कोचर यांची कार (एमएच ०२ सीपी ५५१२) सरळ विरुद्ध बाजूला गेली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या वसावे यांच्या कारवर आदळली. सदर कार दुभाजकावर चढल्याने तिचे टायर फुटले आणि कार तीन-चार वेळा उलटली. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एमएच १५ बीएन २६४१ आणि एमएच १८ डब्ल्यू-८१७० या दोन्ही गाड्या वसावे यांच्या कारवर आदळल्या.त्यात या कारचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील एका बाजुची वाहतूक तासाभरासाठी विस्कळीत झाली. या भीषण अपघातात सटाण्याचे नायब तहसिलदार संजय निंबा शिंदे (४६) व त्यांचा मुलगा अथर्व (पान २ वर)संजय शिंदे (१०) हेही जखमी झाले. जखमींमध्ये निवृत्त न्यायमूर्ती राजन जोधराज कोचर (७३) प्रमिला रजान कोचर (६९) सीमा कपूरचंद चोपडा, दिशा कपूरचंद चोपडा (१५) चालक घनश्याम श्रीलाल चौधरी (३२) (सर्व राहणार, मालाड मुंबई), महेश मोरे व लालसिंग सुरसिंग गंभीर जखमी झाले. सदर अपघात इतका विचित्र होता की, प्रथम दर्शनी कोणती गाडी कोणत्या गाडीवर आदळली हेही समजत नव्हते. अपघाताचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश बोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अब्युलन्समधून औषधोपचारासाठी व्होकार्ट दवाखान्यात दाखल करण्यात आले. काही जखमींना नाशिकमधील लोकमान्य हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. (वार्ताहर)