ओझरच्या तांबट गल्लीत राहणाऱ्या योगेश उत्तम सोनवणे (२४) या तरुणाने राहत्या घरातील किचनमधील खिडकीला दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेचे वृत समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पिंपळगाव रुग्णालयात पाठविला. दरम्यान योगेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी ओझर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास हवालदार के. डी. यादव करीत आहेत.
ओझरला तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 00:59 IST