शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

ओझरला यात्रोत्सव काळात डीजेवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:53 IST

ओझर : हल्ली सूचना करणारे अनेक परंतु अमलात आणणारे कमी असतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये डीजे वाजविण्याला बंदी आहे त्यामुळे यात्रा काळात कोणीही मिरवणुकीसाठी डीजेचा वापर करू नये त्या ऐवजी पारंपरिक बेंजो किंवा संभळ- वाजंत्रीचा वापर करावा अन्यथा डीजेधारकांसह वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, खंडेराव महाराज यात्रा काळात कोणतेही गालबोट लागणार नाही यासाठी मानकऱ्यांसह ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले.

ठळक मुद्देखंडेराव महाराज यात्रा : शांतता समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कओझर : हल्ली सूचना करणारे अनेक परंतु अमलात आणणारे कमी असतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये डीजे वाजविण्याला बंदी आहे त्यामुळे यात्रा काळात कोणीही मिरवणुकीसाठी डीजेचा वापर करू नये त्या ऐवजी पारंपरिक बेंजो किंवा संभळ- वाजंत्रीचा वापर करावा अन्यथा डीजेधारकांसह वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, खंडेराव महाराज यात्रा काळात कोणतेही गालबोट लागणार नाही यासाठी मानकऱ्यांसह ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले.येत्या २ डिसेंबरपासून सुरू होणाºया यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ओझर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम, महामार्ग वाहतूक नियंत्रक सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम, महामार्ग प्राधिकरण सुपरवायझर सागर पाटील, महाले, महावितरण अधिकारी विक्र म सोनवणे आदी उपस्थित होते.सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम म्हणाल्या की, सध्या ओव्हरब्रिजचे काम चालू आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दुकाने रोडपासून दूर ठेवावी, यात्रा काळातील महामार्गाची वाहतूक वरिष्ठांना सूचित करून डायव्हर्ट केली जाईल. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे म्हणाले की, यात्रा काळात महामार्ग अधिकाºयांनी रोड दुरुस्त करून वर्दळीच्या ठिकाणी (रोड क्रॉसिंगवर) गतिरोधक बसवावे, टिळकनगर अंडरपासखाली लाइट लावावेत, डायव्हर्शनच्या ठिकाणी सिग्नल बसवावे, प्लॅस्टिकमुक्तीसाठी यात्रा कमिटी आणि ग्रामपालिका यांनी यात्रा काळात सजग राहावे.प्रकाश महाले यांनी पुलापासून सायखेडा फाट्यापर्यंत स्वच्छता करून बाजारपेठ आदी भागात लाइटची व्यवस्था करून रस्त्यातील खड्डे बुजवावे, रमेश मंडलिक यांनी बारागाडे वेळेत आणावे, अवांतर टवाळेखोरांवर नजर ठेवावी, फेट्यांची प्रथा बंद करावी. यतिन कदम यांनी ग्रामपालिकेकडून यात्रोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी सर्र्वतोपरी मदत केली जाईल, याची ग्वाही दिली. बैठकीचे सूत्रसंचालन नानासाहेब मंडलिक यांनी केले. नागरिकांची पथदीपांची मागणीगाडे ओढण्याच्या वेळी बंदोबस्त कडक करून बारागाडे व अश्व यांना अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी. शब्बीर यांनी हायवेच्या टिळकनगर भुयारी मार्गाला (अंडरपास पुलाखाली) पथदीपांची व्यवस्था करून द्यावी. बाळू चौधरी यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी सूचना केली. विठ्ठल नाना कर्पे म्हणाले की, मानकºयांनी वेळेत गाडे आणावे. मानकºयांनी ज्याच्या त्याच्या कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Ozarओझरtempleमंदिर