शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४० मेट्रिक टन ऑक्सिजन वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 02:09 IST

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी सिन्नर येथील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट व निखिल गॅसेस या प्रत्येकी २० मेट्रिक टन उत्पादन क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्या अधिग्रहित करण्यात याव्यात, अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली असता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. 

नाशिक : ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी सिन्नर येथील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट व निखिल गॅसेस या प्रत्येकी २० मेट्रिक टन उत्पादन क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्या अधिग्रहित करण्यात याव्यात, अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली असता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. 

नाशिक जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांच्या टंचाईबाबत समीर भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या वेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, अन्न, औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त डॉ. माधुरी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते.नाशिकमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ऑक्सिजन बेड्सची मागणी अधिक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता निर्माण होत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी सिन्नर येथील स्वस्तिक एअर प्रॉडक्ट व निखिल गॅसेस या प्रत्येकी २० मेट्रिक टन उत्पादन क्षमता असलेल्या ऑक्सिजन निर्मिती कंपन्या अधिग्रहित करण्यात याव्यात, अशी सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. तसेच कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध उपलब्ध व्हावे यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.या वेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी संबंधित कंपन्या अधिग्रहित करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, रेमडेसिवीर औषध रुग्णांना उपलब्ध होण्यासाठी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच जिल्ह्यात अधिक ५० ड्युरा सिलिंडर खरेदी करण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

रेमडेसिवीर इंजेक्शनवर येणार रुग्णांचे नावn रेमडेसिवीर वितरणात गोंधळ झाल्याची बाब उघड झाल्याने आता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनवर संबंधित रुग्णाचे नाव लिहिले जाणार असल्याची उपाययोजना केली जाणार असल्याचे सांगितले. यामुळे संबंधित रुग्णापर्यंतच इंजेक्शन पोहोचेल तसेच इतर कुणाला नाव असलेले इंजेक्शन मेडिकल्स किंवा रुग्णालयाकडून दिले गेल्यास तात्काळ लक्षात येऊ शकेल. यासाठी अशा प्रकारची उपाययोजना केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारीHealthआरोग्य