नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना बरोबर न घेता जागेची पाहणी केली. त्यामुळे आता सत्तारूढ भाजप आणि आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाल्याचे दिसू लागले आहे. भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी त्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रशासनाचा एकतर्फी कारभाराचा निषेध केला आहे. शहरात कोरोना संक्रमण वाढत असून गंभीर रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यात अडचणी येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने आता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. हवेतून ऑक्सिजन तयार करण्याचा हा प्रकल्प असणार आहे. त्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी मोरवाडी येथील शहरी आरोग्य केंद्र तसेच प्रबोधनकार ठाकरे सभागृह येथील मोकळ्या जागेची पाहणी केली. गंगापूर येथील शहरी आरोग्य केंद्राचीदेखील त्यांनी पाहणी केली. याठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प साकारल्यानंतर ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर भरून देणे शक्य होणार आहे. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयूर पाटील, नितीन नेर, डॉ. योगेश कोशिरे आदी उपस्थित होते. दरम्यान, अशाप्रकारचे ऑक्सिजन प्रकल्प साकारण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांना विश्वासात घेणे आवश्यक होते, परंतु तसे झाले नाही. साथ प्रतिबंधक विशेषाधिकाराचा आयुक्त दुरुपयोग करून एकतर्फी निर्णय घेतात आणि काही अनुचित प्रकार घडल्यास अथवा दुर्घटना घडल्यास भारतीय जनता पार्टीला जबाबदार धरले जाते. प्रशासनाच्या एकतर्फी कारभाराचा निषेध करण्यात येत असल्याचे भाजपा गटनेते जगदीश पाटील यांनी म्हटले आहे.पक्षावर टीका करणे चुकीचेचडॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि बिटको रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसवण्याच्या कामासाठी प्रशासनाने परस्पर निविदा मागवल्या. एकच ठेकेदार कंपनी पात्र ठरेल, अशा अटी ठेवण्यात आल्या. त्यामुळे तीन वेळा निविदा मागवूनदेखील एकच कंपनी पात्र ठरली. आता झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर मात्र प्रशासन सोडून भाजपवर टीका होत आहे. म्हणजेच निर्णय प्रशासनाने घ्यायचे आणि दुर्घटना घडली की सर्वांनी प्रशासन सोडून भाजपावर खापर फाेडण्याचे प्रकार सुरू आहेत. ते चुकीचे आहेत, असे जगदीश पाटील यांनी म्हटले आहे.
महापालिकेत राजकारणाला ‘ऑक्सिजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:42 IST
महापालिकेच्या रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा, यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना बरोबर न घेता जागेची पाहणी केली. त्यामुळे आता सत्तारूढ भाजप आणि आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाल्याचे दिसू लागले आहे. भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी त्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करताना प्रशासनाचा एकतर्फी कारभाराचा निषेध केला आहे.
महापालिकेत राजकारणाला ‘ऑक्सिजन’
ठळक मुद्देआयुक्तांचा पाहणी दौरा : महापौरांना डावलल्याने भाजप नाराज