शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलच्या अतिवापराने वर्षभरात मुलांमध्ये वाढला स्थूलपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:15 IST

नाशिक : शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे पुन्हा ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मुलांचे घराबाहेरचे बहुतांश खेळ यापूर्वीच बंद ...

नाशिक : शाळा, महाविद्यालये बंद असल्याने मुलांचे पुन्हा ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मुलांचे घराबाहेरचे बहुतांश खेळ यापूर्वीच बंद झालेले असल्याने मुले-मुली तासन‌्तास मोबाइलवर खेळत असल्याने त्यांना अशा मनोरंजनाच्या नवीन साधनांची चटक लागली आहे. त्यामुळे मुला- मुलींच्या वर्षभरातील नियमित वजनवाढीपेक्षा अधिकची वजनवाढ, तसेच घरातच राहून सातत्याने फास्टफूड खाण्याचे प्रमाण वाढल्याने स्थुलपणा वाढल्याच्यादेखील तक्रारी वाढल्या आहेत.

अनेक घरांतील मुले तर मोबाइल हातात असल्याशिवाय जेवणदेखील करीत नाहीत, इतके मोबाइलचे व्यसन लागले आहे, तसेच घराबाहेर खेळणे, मित्र, मैत्रिणींच्या गाठीभेटी कमी झाल्याने पायी चालणेदेखील जवळपास बंद झाले आहे. कोरोनापूर्वीच्या काळात अनेक घरांमध्ये मुलांना मोबाइलपासून लांब ठेवण्यात आले होते. किंवा फार तर काही वेळासाठीच मोबाइल हातात मिळत होता. त्यामुळे शाळा, क्लासेस, मैदानी खेळ त्यात मुलांना थोडेफार तरी शारीरिक श्रम, कष्ट पडत होते; पण ऑनलाइन शिक्षणामुळे मुले घरात बसून मोबाइल स्क्रीनच्या आणि टीव्हीच्या संपर्कात राहू लागल्याने केवळ बसून किंवा झोपून लोळत सर्व वस्तू हाताळण्याची पडलेली सवयच स्थूलपणा वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे.

कोट

मुलांना झोपण्यासाठी, खेळण्यासाठी किमान सोसायटीत किंवा घरातील हॉलमध्ये कोणताही एखादा खेळ खेळण्यास प्रवृत्त करणे आवश्यक झाले. आहे, अन्यथा वर्षाला जिथे दोन-तीन किलोची वजनवाढ अपेक्षित असताना जर तिथे सहा-सात किलो किंवा त्यापेक्षाही अधिक वजनवाढ होऊ लागल्यास तो चिंतेचा विषय ठरू लागला आहे.

कोट

मैदाने आणि अन्य क्रीडा संकुलदेखील बंद असल्याने नियमित खेळणाऱ्या मुला-मुलींनाही घरातच थांबण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या फिटनेसमध्येदेखील घट झाली असून, घरीच थांबल्याने त्यांच्या वजनातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे अशा खेळाडू मुला-मुलींच्या वजनातील वाढदेखील त्यांच्या खेळावर परिणाम करणारी ठरणार आहे.

कोट

आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात उच्च उष्मांकयुक्त अन्न सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पौष्टिक घटक मिळत नाहीत; मात्र शरीरावर अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढू लागते. त्याचप्रमाणे कोरोना काळातील लहान मुलांची जीवनशैलीही लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरत असल्याने त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.

मुलांनी हे करावे

लठ्ठपणा टाळण्यासाठी सर्वप्रथम त्यांना मैदानावर खेळण्यास आणि नियमित व्यायाम करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. दररोज सकाळी, संध्याकाळी घरातल्या घरात, गच्चीवर किंवा घराच्या, सोसायटीच्या अंगणात व्यायाम करणे निश्चितच लाभदायक ठरू शकते.

हे करणे टाळावे

फास्ट फूड खाण्यावर अधिकाधिक नियंत्रण आणले पाहिजे किंवा फास्टफूड टाळावे. शीतपेयांची सवय मुलांना असल्यास या कोरोना काळात आणि उन्हाळ्यातही शीतपेय पूर्णपणे वर्ज्य करावीत. मोबाइलचा वापर केवळ अभ्यासासाठी करताना अन्य वेळ मोबाइल हातात देणेच बंद करावे.

----------------------

( ही डमी आहे.)