शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल अडीच हजार पार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:40 IST

जिल्ह्यात कोरोनाने सलग तिसऱ्या दिवशी नवीन उच्चांक स्थापित केला. शुक्रवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल २५०८  रुग्ण बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाने प्रथमच अडीच हजाराचा टप्पा ओलांडल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे वाटचाल करु लागल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

ठळक मुद्देभीतीची छाया :  सलग तिसऱ्या दिवशी आढळले दोन हजारांवर बाधित

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाने सलग तिसऱ्या दिवशी नवीन उच्चांक स्थापित केला. शुक्रवारी (दि. १९) दिवसभरात तब्बल २५०८  रुग्ण बाधित रुग्ण आढळले असून कोरोनाने प्रथमच अडीच हजाराचा टप्पा ओलांडल्याने यंत्रणादेखील संभ्रमित झाली आहे. त्यामुळे जिल्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे वाटचाल करु लागल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल २५०८ बाधित रुग्ण तर ११६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १,ग्रामीणला ३ तर जिल्हा बाह्य १ असा एकूण ५ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या २२०२ वर पोहोचली आहे. गत आठवडाभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने हजार ते पंधराशेवर राहिल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. त्यात बुधवारी कोरोनाबाधितांच्या आकड्याने २१४६ इतका उच्चांक तर गुरुवारी २४२१ पर्यंत बाधितांच्या आकड्याने मजल मारली होती. तर शुक्रवारी त्यापेक्षाही अधिक म्हणजे २५०८ बाधित आढळून आल्याने या वेगाने जिल्ह्याची वाटचाल कुठे सुरु आहे, त्याबाबत जनमानसात चर्चेला उधाण आले आहे. तसेच निर्बंध वाढण्याची चर्चा आहे.दहा दिवसांत बाधित वाढ १५ हजारांनजीकजिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत हजारावर भर पडण्यास ११ तारखेपासून प्रारंभ झाला. ११ मार्चला ११४०, १२ मार्चला ११३८ , १३ मार्चला १५२२, १४ मार्चला १३५६, १५ मार्चला १३७६, १६ मार्चला १३५४  असा सलग आठवडाभर कोरोनाबाधितांच्या संख्येने अक्षरश दररोज हजाराचा आकडा ओलांडला. त्यानंतर कोरोनाबाधितांचा गतवर्षापासूनचा नवीन उच्चांक तब्बल २१४६ बाधित १७ मार्चला, त्यानंतर पुन्हा  १८ मार्चला नवीन उच्चांक २४२१ तर १९ मार्चला सर्वोच्च उच्चांक २५०८ वर पोहोचल्याने गत दहा दिवसात ही बाधित संख्या तब्बल १४ हजार ९९१ म्हणजे १५ हजारांनजीक पोहोचली आहे.जिल्ह्यातील चाचण्यांचे प्रलंबित अहवाल पाच हजारांवरजिल्ह्यात संशयितांची तपासणी आणि नमुने गोळा होण्याच्या प्रमाणात आठवडाभरात कमालीची वाढ झाली आहे. मात्र, नमुना तपासणीच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळेच प्रलंबित अहवालाची संख्या सातत्याने वाढत असून शुक्रवारी ही प्रलंबित अहवाल संख्या ४९५७ वर पोहोचली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी कोरोना बाधितांचा आकडा मोठाच राहण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस