सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने दरवर्षी मार्च अखेरचे वरिष्ठांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकबाकीदारांना स्मरणपत्र, तसेच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास मार्चअखेरपर्यंत घरपट्टीचे ५१ कोटी व पाणीपट्टीचे २२ कोटी मिळून सुमारे ७३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी सोमवार, दि. १७ फेबुवारीपर्यंत घरपट्टीची २४ कोटी २३ लाख इतकी वसुली झाली असून, अजूनही २७ कोटी ७७ लाख इतकी थकबाकी आहे, तर पाणीपट्टीची ११ कोटी इतकी वसुली झाली असून, अजूनही ११ कोटी थकबाकी आहे. वारंवार सांगून, स्मरणपत्र व नोटिसा बजावूनही थकबाकी न भरणाºयांची नळजोडणी बंद करण्याची मोहीम सुरू असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले. घरपट्टी व पाणीपट्टीची अजूनही मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने नागरिकांनी थकबाकी लवकरात लवकर भरावी यासाठी मनपाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील ५० हून अधिक कर्मचारी हे थकबाकीदारांनी कर भरावा यासाठी सिडको भागातून रॅली काढून प्रबोधनही करण्यात आले होते.थकबाकीदारांनी थकबाकी भरावी यासाठी मनपाच्या वतीने स्मरणपत्र, नोटिसा बजावण्यात आल्या असून, यानंतरही थकबाकी न भरणाºयांवर मात्र कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी थकबाकी भरून मनपास सहकार्य करावे.- सोमनाथ वाडेकर,विभागीय अधिकारी, मनपा सिडको विभाग
थकबाकी धडक वसुली मोहीम सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:16 IST
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
थकबाकी धडक वसुली मोहीम सुरूच
ठळक मुद्देमनपा सिडको विभाग : थकबाकीदारांकडून ३६ कोटी रुपयांची वसुली