शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा

By admin | Updated: March 7, 2017 00:46 IST

वीरगाव : बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील कान्हेरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. विशेष म्हणजे एकाच ट्रॅक्टरद्वारे या वाळूची वाहतूक होत आहे.

 वीरगाव : बागलाण तालुक्यातील डोंगरेज येथील कान्हेरी नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत आहे. विशेष म्हणजे एकाच ट्रॅक्टरद्वारे या वाळूची वाहतूक होत आहे. या प्रकरणी सदर ट्रॅक्टरमालकास त्वरित अटक करावी व होणारा वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी डोंगरेजचे सरपंच व उपसरपंच यांनी निवेदनाद्वारे बागलाणचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे. कान्हेरी नदी परिसरात सर्वात मोठे नदीपात्र म्हणून ओळखली जात असली तरी नदीपात्रातून होत असलेला वाळु उपसा यामुळे नदीपात्रात खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याचा धोका नाकारता येत नाही. तसेच या प्रकारामुळे परिसरातील विहीरींची पाण्याची पातळी खालावत चालली आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. यासाठी डोंगरेज ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन वाळु उपसा बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला होता. परंतु गावातीलच एका ट्रॅक्टरमालकाने या निर्णयाला केराची टोपली दाखवित आपली मुजोरी कायम ठेवली आहे. त्यास गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी वारंवार समज देण्याचा प्रयत्न केला असता, तुम्हाला काय करायचे ते करा, आमचे कुणीही वाकडे करु शकत नाही. अशा आशयाचा सज्जड दम देत हा ट्रॅक्टरमालक ग्रामस्थांनाच जिवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहे. डोंगरेज येथील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार यांची भेट घेत संंबंधित ट्रॅक्टरमालकावर कारवाई करण्यात यावी, यासाठी निवेदन दिले. (वार्ताहर)