शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

काळाराममंदिरा बाहेरील सुशोभिकरणाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:23 IST

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर सुशोभीकरणाचे काम सुरू असताना काही महिन्यांपूर्वी दगडी चबुतरा व पायऱ्या आढळून आल्या होत्या. या घटनेला तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप काळाराम मंदिर बाहेरील सुशोभीकरणाचे काम न झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देकाही महिन्यांपूर्वी दगडी चबुतरा व पायऱ्या आढळून आल्या होत्याराम मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध

नाशिक : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर सुशोभीकरणाचे काम सुरू असताना काही महिन्यांपूर्वी दगडी चबुतरा व पायऱ्या आढळून आल्या होत्या. या घटनेला तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप काळाराम मंदिर बाहेरील सुशोभीकरणाचे काम न झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.      अनेक महिन्यांपासून हे काम रखडल्याने काम कधी पूर्ण होणार याबाबत तर्कवितर्कवर्तिवले जात आहे. आगामी रामनवमी, रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी शेकडो रामभक्तांनी केली आहे. गेल्या वर्षापासून राममंदिर बाहेरचा परिसर सुशोभिकरण काम शासनाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले. या कामासाठी पूर्व दरवाजाच्या बाहेरील परिसर खोदकाम करत असताना तीन ते चार फुटांवर दगडी पायºया आढळून आल्या होत्या तर पायऱ्यांचे अजून काही गूढ आहे का हे शोधण्यासाठी आजूबाजूचा काही परिसर खोदण्यात आला होता. सदर पायºया आणि चबुतरा पुरातन असल्याने त्याला कोणताही धक्का न लावता काम सुरू करण्यात आले होते तसेच सुशोभिकरण काम करताना मंदिरासमोर खोदकाम केलेल्या जागेत पुरातन दगड लावण्यात येणार असल्याचे त्यावेळी स्पष्ट केले होते. सुशोभीकरणासाठी खोदकाम करून अनेक महिने लोटले असले तरी अद्याप पर्यंत सुशोभिकरणाच्या कामाला गतीने मिळाल्याने रामनवमी उत्सव सुरु होण्यापूर्वी सदर सुशोभीकरणाचे काम पूर्ण होणार का यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काळाराम मंदिर पूर्व दरवाजासमोरील रस्ता खोदकाम केल्याने मंदिरात देव दर्शनासाठी येणाºया भाविकांना उत्तर व दक्षिण दरवाजाने मंदिरात दर्शनासाठी येजा करावी लागत आहे. राम मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध असल्याने देशभरातील भाविक राममंदिर बघण्यासाठी येतात काही दिवसांपासून राममंदिर बाहेरील परिसर सुशोभीकरण काम सुरू करण्यात आले खरे मात्र सध्या काम कासवगतीने सुरू असल्याने काम पूर्ण कधी होणार असा सवाल राम भक्तांनी केला आहे.लवकरात लवकर काम पूर्ण करावेश्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजाबाहेर परिसर सुशोभीकरणाचे काम शासनाच्या माध्यमातून केले जात आहे. पुर्व दरवाजा समोर खोदकाम केलेल्या जागेवर पुरातन दगड टाकला जाणार असून सदर दगड हा नेवासा येथून आणला जाणार असल्याचे समजते. रामनवमीपूर्वी सदर सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून मंदिराची शोभा कशाप्रकारे वाढेल याचा प्रयत्न प्रशासनातर्फे झाली पाहिजे.मंदार जानोरकर, विश्वस्त काळाराम मंदिर,

टॅग्स :Nashikनाशिकkalaram templeकाळाराम मंदीरgodavariगोदावरी